शहीददिनी अभिवादन
By admin | Published: March 24, 2015 01:11 AM2015-03-24T01:11:24+5:302015-03-24T01:11:24+5:30
बुलडाणा येथे शहीद दिनानिमित्त रॅली.
बुलडाणा : भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या भगतसिंग- सुखदेव-राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्ताने २३ मार्च रोजी शहरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातून रॅलीही काढण्यात आली. स्थानिक शहीद भगतसिंग विचार मंचाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता स्थानिक हुतात्मा गोरे स्मारकामध्ये भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र प्रगती वाचनालयाचे सचिव प्रा.किसन वाघ, उर्दू शायर डॉ.गणेश गायकवाड यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यावेळी भगतसिंग-सुखदेव-राजगुरू अमर रहे, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या. सुधीर देशमुख यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, ऐन तारुण्यात भगतसिंग व त्यांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी आपले सर्वोच्च बलीदान दिले. अशा क्रां ितविरांचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर तहसील चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, बाजार लाईन मार्गे जयस्तंभ चौकात रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी मान्यवरांनी जयस्तंभ चौकाचे पूजन केले. यावेळी निशिकांत ढवळे, नरेंद्र लांजेवार, रणजितसिंह राजपूत, पंजाबराव गायकवाड, प्रशांत सोनोने यांच्यासह इतर उपस्थित होते.