गुटख्यासह मारूती व्हॅन जप्त
By admin | Published: July 16, 2014 11:56 PM2014-07-16T23:56:26+5:302014-07-17T00:44:05+5:30
नांदुर्यात विक्रीसाठी येत असलेला १२ हजाराच्या गुटख्यासह मारुती व्हॅन जप्त.
नांदुरा : आसलगाव येथून नांदुर्यात विक्रीसाठी मारुती व्हॅनमध्ये येत असलेला गुटखा नांदुरा पोलिसांनी पकडून १२ हजाराच्या गुटख्यासह मारुती व्हॅन ताब्यात घेतली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मात्र फरार झाले.
राज्य सरकारने गुटख्यावर बंदी आणली; मात्र नांदुरा शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. रविवारी रात्री एक मारुती व्हॅन गुटख्याचा माल घेऊन आसलगाव येथून नांदुर्याकडे येत असल्याची माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर ठाणेदार साळुंके यांच्यासह पोकॉं मिलिंद सोनवणे व खुपीया विभागाचे गजानन वाघमारे यांनी मारुती व्हॅन क्र. एमएच ३0 एए ४७0६ हिला जळगाव जा. रोडवर पोलिस वसाह तीसमोर थांबवून तिची तपासणी केली असता, त्यात विमल कंपनीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी १२ हजाराच्या गुटख्यासह व्हॅन ताब्यात घे तली. याप्रकरणी घटनेच्या दुसर्या दिवशी १४ जुलै रोजी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभाग बुलडाणाचे अन्न सुरक्षा अधिकारी मारुती रामलु घोसळवाड यांच्या फिर्यादीवरुन गुटखा मालक पवन ओमप्रकाश केला व व्हॅनचालक दीपक वसंतराव बोराखडे रा. आसलगाव ता. जळगाव जामोद याच्याविरुद्ध अप नं. ९२/१४ कलम ३२८, २७२, २७३, १८८ भादंविसह अन्न सुरक्षा कायदा ५९(१)(३) अन्वये गुन्ह्याची नोंद केली. आरोपी मात्र फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.