मास्कने लिपस्टिकची लाली घालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:18+5:302021-04-29T04:26:18+5:30
बुलडाणा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. ...
बुलडाणा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणेसुद्धा अवघड झाले आहे. यामध्ये सलून, ब्युटीपार्लर बंद आहेत. कोरोनाच्या काळात घराबाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने कॉस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून कॉस्मेटिक व्यवसाय अडचणीत आला आहे.
सलून, ब्युटीपार्लर अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने व्यवसाय बंद आहे. मध्यंतरी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यावर कॉस्मेटिकसह ब्युटीपार्लर व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत होता; मात्र आता कोरोना झपाट्याने वाढत आहे. परिणामी, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या कोरोनाकाळात लग्नसमारंभ, कार्यक्रम २५ जणांच्या उपस्थितीत सुरू आहे. घराबाहेर पडण्याचे काम नसल्याने महिलांना
ब्युटीपार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही़ त्यामुळे कॉस्मेटिक व्यवसाय अडचणीत आला आहे. काॅस्मेटिकची दुकानेही बंद असल्याने व्यावसायिक संकटात सापडले आहेत़
२४ तास घरातच, ब्युटीपार्लर हवे कशाला...?
संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहे. कॉस्मेटिकची दुकाने बंद आहेत. साहित्य मिळत नाही. लग्न, समारंभासाठी ॲडव्हान्स पैसे घेतले असल्याने पेसे परत देण्याची वेळ आली आहे. गतवर्षीपासून ब्युटीपार्लर बंदच ठेवावे लागत आहे़ त्यामुळे आर्थिक संकट आले आहे़
ज्योती इंगळे, ब्युटीपार्लरचालक
अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने व्यवसाय बंद आहे. संचारबंदीआधी लग्नाच्या ऑर्डर घेतल्या आहेत; मात्र लग्न समारंभ २५ लोकांमध्ये असल्याने या ऑर्डरही रद्द होण्याची वेळ आली आहे. महिलांना घरातच राहावे लागत आहे. व्यवसाय बंद असल्याने माेठे नुकसान होत आहे.
अमृता पाठक, ब्युटीपार्लरचालक
घरीच होतो शृंगार
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ब्युटीपार्लर बंद आहे. दिवसभर घरातच राहावे लागते. त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही. मागील लॉकडाऊनमध्ये ब्युटीपार्लरच्या थोड्या टिप्स माहीत करून घेतल्या होत्या. काही शृंगार करावयाचा असल्यास तो घरीच करते.
भारती खर्चे
२४ तास घरातच
संचारबंदी असल्याने बाहेर जाणे बंद आहे. नातेवाइकांमधील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. लग्न समारंभही मोजक्याच पाहुण्यांमध्ये पार पडत आहे़ त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये जाऊन शृंगार करणे आवश्यक वाटत नाही. घरातच २४ तास राहावे लागत आहे.
प्रियंका क्षीरसागर
काॅस्मेटिक दुकाने जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत नाही़ त्यामुळे १५ एप्रिलपासून दुकाने बंदच आहेत़ त्यामुळे, व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकानातील साहित्य कालबाह्य होत आहे़ व्यावसायिकांचे मालाच्या पैशासाठी सतत फोन येत
आहे. आर्थिक चक्र बंद असल्याने पैशाची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे़
जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत
आहे.
शे़ रफीक
कॉस्मेटिक विक्रेता