पोलिसांचा फौजफाटा दिसताच लावला जातो मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:17+5:302021-04-18T04:34:17+5:30
तर शहरी भागात आणि मुख्य मार्गावर पोलीस तैनात आहेत. मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतु ...
तर शहरी भागात आणि मुख्य मार्गावर पोलीस तैनात आहेत. मास्क न लावणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतु अनेकजण पोलिसांची गाडी दिसताच मास्क लावतात. पोलीस गेल्यानंतर पुन्हा तोंडाला लावलेले मास्क खिशात जाऊन बसते. यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शहरातील कापड दुकान, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, हार्डवेअर, सोनाराचे दुकान, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, शिवणकाम, चांभारकाम, मोबाईल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स, रिक्षाचालक आदी व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने त्यांच्यावर आधारित लोकांची पुरती कोंडी झाली आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दुकाने सुरू करणाऱ्या चौघांना दंड
बुलडाणा शहरात दुकाने उघडल्या प्रकरणी नगरपालिकेकडून १७ एप्रिल रोजी चार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एक दुकानाला ५०० रुपये याप्रमाणे चार दुकानदारांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
बुलडाण्यात एका दिवसाला झालेली कारवाई
विना मास्क फिरणारे ९ ४,५०० रुपये
संचारबंदीचे उल्लंघन २० ४,००० रुपये
दुकाने उघडे ठेवणे ४ २,०००