मस, उतावळी प्रकल्प १00 टक्के भरले!
By admin | Published: August 28, 2016 11:16 PM2016-08-28T23:16:06+5:302016-08-28T23:16:06+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा.
बुलडाणा,दि. २८: पावसाळा सुरू होवून अर्धा कालावधी लोटल्यानंतर जिल्ह्याचा काही भागात अद्या पही दमदार पाऊस न पडल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचे संकट कायम आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील मस व उतावळी प्रकल्प १00 टक्के भरले असून इतर प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सिंचन व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. सिंचनामुळे अनेक शेतकर्यांना जमिनी चांगल्या असल्यातरी पाणी देता येत नाही. तर पाणीटंचाईमुळे अनेक गावे उन्हाळ्यात होरपळतात. त्यामुळे दरवर्षी पिण्याचा पाण्यासाठी करोडो रूपये खर्च करावे लागतात. शेवटी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. यावर्षी मागिल वर्षापेक्षा दुप्पट पाऊस असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट पाहता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील घाटाखालील भागात दमदार पाऊस झाल्यामुळे काही धरणे, प्रकल्प भरली आहेत. त्यात मस, उतावळी धरणाचा समावेश आहे. मात्र घाटावरील परिसरातील प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
सध्यास्थितीत जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात १९.१0, पेनटाकळी २६.१६ व खडकपूर्णा प्रकल्पात ३४.६७ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील पलढग प्रकल्पात ४८.0७, ज्ञानगंगा ४३, मस १00, कोराडी ८१.३५, मन ६४.३८, तोरणा ३७.९0, व उतावळी प्रकल्पात १00 टक्के जलसाठा आहे. तसेच जिल्ह्यात ७४ लघुप्रकल्पात कमी-जास्त प्रमाणात जलसाठा असून दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
मूग बाजारात आल्यानंतर भाव घसरले
सध्या जिल्ह्यातील शेतकर्यांची कसरत सुरू आहे. एका बाजूला शेतकरी निसर्गाशी दोन हात करीत असून दुसर्या बाजूला व्यापार्यांशी मुकाबला करीत आहे. यापूर्वी मुगाला ८ हजारापर्यंंंंत भाव होता. त्यावेळी शासनाने मुगाचा हमी भाग ५ हजार २00 जाहीर केला होता. मात्र शेतकर्यांजवळ मुग नव्हता. त्यामुळे शासनाने मुग आयात केला. त्यामुळे मुगाचे भाव गडगडले. आता शेतकर्यांचा मुग घरी येत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्याच्या मुगाला ४ ते ४ हजार ५00 भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शे तकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने हमी भावात वाढ करून शेतकर्यांसाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.