बनावट रेमडेसिविर प्रकरणातील सूत्रधार सुटणार नाहीत- डॉ. राजेंद्र  शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:16 AM2021-05-10T10:16:23+5:302021-05-10T10:16:37+5:30

Dr. Rajendra Shingane : लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

The masterminds in the fake RemediSivir case will not be released. Rajendra Shingane | बनावट रेमडेसिविर प्रकरणातील सूत्रधार सुटणार नाहीत- डॉ. राजेंद्र  शिंगणे

बनावट रेमडेसिविर प्रकरणातील सूत्रधार सुटणार नाहीत- डॉ. राजेंद्र  शिंगणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : बनावट रेमडेसिविर विक्री प्रकरणातील सूत्रधार कदापिही सुटणार नाही. या प्रकरणातील सूत्रधारांच्या आम्ही मागावर असून योग्य टप्प्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोबतच राजकीय हस्तक्षेप करून दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो कितीही मोठा असला तरी लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असे राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविवारी बुलडाणा येथे स्पष्ट केले.
बुलडाणा शहरात दोन दिवसांपूर्वी बनावट रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन नामांकित रुग्णालयातील कर्मचारी, वॉर्डबाय यांना ९ इंजेक्शनसह अटक केली आहे. १० मेपर्यंत या आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नांदुरा येथेही दहा रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत. दोषींवर कारवाई होईलच. या प्रकरणाच्या मागे असलेले सूत्रधार नेमके कोण आहेत हे लक्षात आले आहे. फार दिवस ते लपून राहू शकत नाहीत. योग्यवेळी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असे राज्याचे अन्न व अैाषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. कोरोना संसर्ग प्रतिबंध आढावा बैठकीच्या निमित्ताने ते ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. सूत्रधारांना  वाचविण्यासाठी जर कोणी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: The masterminds in the fake RemediSivir case will not be released. Rajendra Shingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.