मातंग समाजाचे बुलडाणा तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:27 PM2018-10-23T18:27:25+5:302018-10-23T18:27:56+5:30

बुलडाणा : मातंग समाजावर होणाºया अन्याय, अत्याचाराविरोधात मातंग एकता आंदोलनच्या वतीने २३ आॅक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Matang community agitation in Buldana Tahsil | मातंग समाजाचे बुलडाणा तहसीलसमोर धरणे

मातंग समाजाचे बुलडाणा तहसीलसमोर धरणे

Next

बुलडाणा : मातंग समाजावर होणाºया अन्याय, अत्याचाराविरोधात मातंग एकता आंदोलनच्या वतीने २३ आॅक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मातंग समाजावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून समाजात दहशतीचे वातावरण आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील आडगावराजा येथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने मातंग समाजातील कुटूंबावर हल्ला करुन राम साबळे या युवकाचा खून केला. तसेच त्याचे वडील व भाऊ यांना गंभीर जखमी केले. अशा अन्यायकारक घटना मनात चीड निर्माण करणाºया आहेत. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, करिता विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अन्यायग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदत द्यावी, राज्यात मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाला आळा घालून भविष्यात अशा घटना घडणार नाही याबाबत उपाययोजना करावी, क्रांतीविर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करुन त्याची अंमलबजावणी करावी, रमाई आवास योजनेचे २०१८-१९ चे उद्दिष्ट्ये वेळेच्या आत पूर्ण करावे, दादासाहेब गायकवाड भुमिहीन स्वाभिमानी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, निवास व शेतीकरिता अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारकांना मालकीपट्टे देण्यात यावे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला जास्तीचा निधी देऊन गरजुंची प्रकरणे तत्काळ मंजूर करावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजय निकाळजे, बी. के. खरात, ओमप्रकाश नाटेकर, समाधान निकाळजे, पी. डी. महाले, अ‍ॅड. दिगंबर अंभोरे, पळसखेड भटच्या सरपंच भाग्यश्री गायकवाड, भगवान गायकवाड, धनंजय गायकवाड, श्रीकृष्ण तायडे, पुंडलिक बावस्कर, अजय निकाळजे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले.

Web Title: Matang community agitation in Buldana Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.