माथाडी कामगारांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार : धनावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:35+5:302021-01-21T04:31:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशीलतेने स्वत:हून कामगारांच्या समस्या जाणून घेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशीलतेने स्वत:हून कामगारांच्या समस्या जाणून घेत आहेत. यासाठीच राज्यभरात कामगार मेळावे घेतले जात आहेत. या माध्यमातून कामगारांच्या समस्यांची सखोल माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन माथाडी कामगार जनरल सेनेचे नेते रवींद्र धनावडे यांनी चिखली येथे केले. चिखली येथे रविवारी माथाडी कामगार सेनेचा मेळावा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून कामगारांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी मुंबईवरून माथाडी कामगार जनरल सेनेचे नेते रवींद्र धनावडे यांनी या मेळाव्यात कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. माथाडी कामगार जनरल सेनेचे युवा नेते केतन तनपुरे, शिवसेनेचे भास्करराव मोरे, प्रा.नरेंद्र खेडेकर, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, नगरसेवक दत्ता सुसर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, शहर संघटक प्रीतम गैची, युवा सेनेचे विलास घोलप, रवी पेटकर, आनंद गैची, बंटी कपूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक माथाडी कामगार सेनेचे विदर्भाध्यक्ष तथा चिखली बाजार समितीचे संचालक गजानन पवार यांनी केले. या मेळाव्याला बहुसंख्य कामगार उपस्थित होते.