शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:06 PM2023-04-11T21:06:18+5:302023-04-11T21:07:55+5:30

यावेळी त्वरित दारूबंदी करण्यासाठी पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांना निवेदन सादर केले.

Matrashakti agitation at the police station to stop the sale of liquor in Shankar Nagar | शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या

शंकर नगरातील दारू विक्री बंद करण्यासाठी मातृशक्तीचा पोलिस ठाण्यात ठिय्या

googlenewsNext

खामगाव : स्थानिक शंकरनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीसह अवैध व्यवसाय सुरू असून अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक महिलांनी मंगळवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. यावेळी त्वरित दारूबंदी करण्यासाठी पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केले की, शंकरनगर भागात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याशिवाय जुगार, गांजा विक्रीचा व्यवसाय ही सुरू आहे. अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करून अवैध धंद्यांना आळा घालावा अन्यथा शहर पोलिस स्टेशनसमोर धरणे आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा ही निवेदनात दिला आहे. निवेदनावर पद्माबाई गव्हांदे,  इंदुमती सावदेकर, उमाबाई सुरवाडे, सविता इंगळे, संगीता लोखंडे, नैना गव्हांदे, आरती गवई सह २६ महिलांच्या स्वाक्षऱ्या व नावे आहेत. अवैध धंदे बंद व्हावेत या मागणीसाठी महिलांनी बराच वेळ शहर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता.

Web Title: Matrashakti agitation at the police station to stop the sale of liquor in Shankar Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.