मातृवंदना योजना व पोषण आहार सप्ताह साजरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:14+5:302021-09-06T04:38:14+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मातृवंदना योजना सप्ताह व पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने गरोदर मातेच्या आहारांच्या जागरुकतेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मातृवंदना योजना सप्ताह व पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने गरोदर मातेच्या आहारांच्या जागरुकतेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये व डॉ. तेजनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात २ सप्टेंबर राेजी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ . कुकडे तसेच आय .सी.डी .एम. अधिकारी आश्वनी सोने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी गरोदर मातांच्या सकस आहारांबाबत व नियमित स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान आरोग्य सेविका क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना व जे.एस.वाय. या बाबत गरोदर मातांना माहिती दिली़ १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंत सप्ताह सर्व ठिकाणी साजरा करण्यात येत असतो त्या अनुषंगाने सुलतानपूर येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे़ या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी गुंजकर , चंद्रशेखर, आशा गट प्रवर्तक गंगा अंभोरे, अंगणवाडी सेविका व आशा , मदतनीस व गरोदर माता उपस्थित होत्या़