शौचालय नोंदीमध्ये मलकापूर राज्यात अव्वल!

By admin | Published: August 28, 2015 12:15 AM2015-08-28T00:15:50+5:302015-08-28T00:15:50+5:30

संपूर्ण स्वच्छता अभियानात ऑनलाइन नोंदणीमध्ये मलकापूर तालुक्यास मिळाला सन्मान.

Maulapur tops in toilet list! | शौचालय नोंदीमध्ये मलकापूर राज्यात अव्वल!

शौचालय नोंदीमध्ये मलकापूर राज्यात अव्वल!

Next

मनोज पाटील / मलकापूर (जि. बुलडाणा) : स्वच्छ भारत अभियान ग्रामीण कक्ष अंतर्गत तालुक्यातील शौचालयासंदर्भात मूलभूत सर्वेक्षण करून सदर बेसलाइनच्या ऑनलाइन नोंदीला गतिशीलता दिल्याने ऑनलाइन नोंदणीचे कार्य करणारा मलकापूर तालुका हा राज्य शासनाच्या वेबसाइटवर १00 टक्के नोंदी करणारा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे. मलकापूर तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायती असून, एकूण कुटुंब संख्या २0 हजार ९१७ आहे. त्यापैकी १२ हजार ९७६ कुटुंबांकडे शौचालये असून, ७ हजार ९४१ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. आतापर्यंंत २0१४ शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात २0 हजार ९१७ कुटुंबांपैकी १४ हजार ९९0 कुटुंबांकडे शौचालय असून, ५ हजार ९२७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. आजरोजी तालुक्यातील गोराड, कुंड खु., दुधलगाव खु., तालसवाडा, मोरखेड बु., शिराढोण आदी गावे १00 टक्के हगणदारीमुक्त झालेली असून, सन २0१५-१६ अंतर्गत स्वच्छ भारत अभियानामार्फत ७४९ लाभार्थ्यांंना प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे बक्षीसपर अनुदान वाटप झालेले असून, १0५ लाभार्थ्यांंनी स्वखर्चाने शौचालये बांधलेली आहेत. त्याचप्रमाणे निर्मल भारत अभियान अंतर्गत यापूर्वी ४ हजार ६00 रुपये प्रमाणे ४८९ लोकांना शौचालयाकरिता अनुदान वाटप झालेले आहे. भारत अभियान २0१४-१५ अंतर्गत निवड झालेल्या तालुक्यातील १00 टक्के हगणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, ही वाटचाल यशस्वी करण्याकरिता ३१ मार्चपर्यंंत ५९२७ शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी डॉ. एस.टी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान कक्षाचे तालुका समन्वयक विलास निकम सहकारी मिथून जाधव, सिद्धार्थ तायडे व पंकज राठोड यांनी घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण प्राप्त होताच या कक्षाने संगणक प्रणालीद्वारे बेसलाइनच्या नोंदीला ऑनलाइन केले आहे.

Web Title: Maulapur tops in toilet list!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.