गॅस सिलिंडरवर आता कमाल १० रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:23 PM2020-10-07T13:23:09+5:302020-10-07T13:24:50+5:30

Buldhana News गत सहा महिन्यांपासून गॅस धारकांच्या खात्यात चार ते १० रुपये सबसीडी जमा होते.

Maximum subsidy of 10 Rs on Gas cylender | गॅस सिलिंडरवर आता कमाल १० रुपये अनुदान

गॅस सिलिंडरवर आता कमाल १० रुपये अनुदान

Next

- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गॅसवर मिळणारी सबसीडी निच्चांक पातळीवर पोहचली आहे. जानेवारी महिन्यात १७२ रुपये सबसीडी मिळत होती, तर मार्च महिन्यात ती २४७ रुपयांपर्यंत गेली होती. मात्र केंद्र सरकारने अनुदानीत गॅसच्या बेसीक दरात वाढ केल्याने गत सहा महिन्यांपासून गॅस धारकांच्या खात्यात चार ते १० रुपये सबसीडी जमा होते. त्यामुळे, सबसीडीसाठी संयुक्त खाते उघडणाऱ्या ग्राहकांना नाहकचा भुर्दंड सहन करावा लागतोय.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने गॅसची सबसीडी देण्यात येते. गॅसवरील सबसीडी ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. बेसीक भाव आणि बाजार भाव यांच्यामध्ये असलेल्या फरकाची रक्कम सरकारकडून ग्राहकांच्या खात्यात सबसीडी म्हणून जमा करण्यात येते. केंद्र सरकाने पेट्रोलियम पदार्थांच्या दरावरील सरकारचे नियंत्रण संपुष्टात आणले आहे. त्यामुळे, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर ठरविण्याची अधिकार पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात आले. ग्राहकांना वर्षभरात अनुदानीत १२ सिलिंडर देण्यात येतात. ग्राहकांकडून बाजार भावाप्रमाणे पैसे वसुल करण्यात येतात. त्यानंतर फरकाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. लॉकडाऊनंतर गॅसचे दर साततत्याने घटत आहेत. मात्र, सरकारने बेसीक किंमतीत वाढ केल्याने ग्राहकांना सहा महिन्यांपासून केवळ चार रुपयांपासून तर १० रुपयांपर्यंत सबसीडी मिळत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरची किंमत ७०५ रुपये असताना त्यावर २८२ रुपये तर मार्च महिन्यात ७९८ असतांना त्यावर २२१ रुपंयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होत होते. त्यानंतर एप्रिल महिन्यानंतर गॅस सिलिंडरचे दर घसरल्यानंतर अनेक ग्राहकांना चार ते १५ रुपये अनुदान खात्यात जमा होत आहे.
तसेच सप्टेंबरमध्ये सिलिंडरचे भाव ६१४ रुपये ५० पैसे असताना ग्राहकांच्या खात्यात सबसीडीचे केवळ ४ रुपये ५० पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे, केंद्र सरकारने गॅस वरील सबसीडी बंद केल्यातच जमा असल्याचे चित्र आहे.

उज्वला योजनेच्या ग्राहकांना फटका
केंद्र सरकारच्या वतीने उज्वला योजनेंर्तंत अनेक गरीब लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या ग्राहकांना काही महिने सरकारने मोफत सिलिंडर दिले आहेत. सरकारचे मोफत सिलिंडर संपल्यानंतर या ग्राहकांना अनुदानीत सिलिंडर घ्यावे लागणार आहे.


गरीब लाभार्थ्यांना बसणार फटका
सबसीडी कमी केल्याचा फटका या गरीब लाभार्थ्यांना बसणार आहे. सरकारने श्रीमंताना सबसीडी सोडण्याचे आवाहन केले होते. आता गरीब आणि श्रीमंत यांना जवळपास सारख्याच भावाने सिलिंडर मिळणार आहे.

Web Title: Maximum subsidy of 10 Rs on Gas cylender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.