‘एमसीए’च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:41 AM2017-06-30T00:41:56+5:302017-06-30T00:41:56+5:30

थेट द्वितीय वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाने नकार दिल्यामुळे "एमसीए"च्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे.

MCA students' education year threatens! | ‘एमसीए’च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात!

‘एमसीए’च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात!

Next

फहीम देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) व अमरावती विद्यापीठातील समन्वयाच्या अभावाचा फटका मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) च्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांना बसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. थेट द्वितीय वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाने नकार दिल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
एमसीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून, या अभ्यासक्रमासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमसीच्या प्रवेश परीक्षेनंतर यापूर्वी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येत होता. मात्र, आता विद्यापीठाने एमसीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश न देण्याचे धोरण आखले आहे. एमसीए अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून म्हणजेच तीन वर्षे पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘एमसीए’च्या प्रथम वर्षाचा किमान ७५ हजार रुपये अतिरिक्त खर्च, याशिवाय एक वर्ष अतिरिक्त द्यावे लागणार आहे.
विदर्भात एमसीएचे एकूण २५ कॉलेजेस असून, यामध्ये सुमारे १७५० विद्यार्थी शिक्षण घेतात. बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेले विद्यार्थी जे एमसीएच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छितात अशांची संख्या ६५० च्या जवळपास आहे. यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश द्यावा, असे साकडे पश्चिम विदर्भातील विद्यार्थी शृंग पाठक, शुभम श्रीनाथ, तृप्ती देशमुख या विद्यार्थ्यांनी घातले आहे.

Web Title: MCA students' education year threatens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.