बुलडाणा तालुक्यातील २५ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:25+5:302021-05-12T04:35:25+5:30
गावाच्या लोकसंख्येनुसार विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. विंधन विहिरी मंजूर करण्यात आलेली सर्व गावे बुलडाणा तालुक्यातील आहे. बुलडाणा ...
गावाच्या लोकसंख्येनुसार विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. विंधन विहिरी मंजूर करण्यात आलेली सर्व गावे बुलडाणा तालुक्यातील आहे. बुलडाणा तालुक्यातील मौंढाळा एक विंधन विहीर, साखळी बु दोन, भादोला २, देऊळघाट ३, माळविहीर एक, सव दोन, तांदुळवाडी एक, उमाळा एक, येळगांव एक, सुंदरखेड तीन, इरला एक, भडगांव एक, ढासाळवाडी एक, पिंपळगाव सराई दोन, सैलानी दाेन, गुम्मी दाेन, धाड २, दुधा एक, चिखला एक, रायपूर दोन, अंभोडा एक, घाटनांद्रा एक, पाडळी दोन, डोंगरखंडाळा तीन व मासरूळ गावासाठी एक विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण ४० विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.