यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 06:01 PM2018-09-07T18:01:07+5:302018-09-07T18:01:11+5:30

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत.

The mechanism reduced Bulls numbers by 12 percent | यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या १२ टक्केने घटली

googlenewsNext

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या भरोश्यावर केली जाणारी शेती ट्रॅक्टरवर आली आहे. त्यातच शेती व्यवसाय बेभरोश्याचा झाला असून जनावरांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील बैलांची संख्या १२ टक्केने घटली असून सध्या राज्यात ९ लाख ४९ हजार १५८ बैलांचा वापर होत आहे. बैलांच्या भरवश्यावर केली जाणारी शेती आता यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरवर आली आहे. शेतीत यांत्रिकीकरण वाढत असल्याने बैलांची संख्या घटली आहे. चारा टंचाई, बैलांच्या किंमती, त्यांना पोसण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. शेतातील नांगरणी, कुळपणी, पेरणी, मळणी यासारखी अनेक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेत जवळपास ३८ टक्केच बैलांची संख्या उरली आहे. सन २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार राज्यात ५ लाख ४१ हजार ९४४ विदेशी जातीचे तर ७६ लाख ३० हजार ९२० देशी जातीचे असे एकूण ८१ लाख ७२ हजार ८६४ बैल होते. त्यात जवळपास १२ टक्के घट होवून सन २०१२ मध्ये ४ लाख ४३ हजार ८६६ विदेशी तर ६७ लाख ७९ हजार ८४० देशी असे एकूण ७२ लाख २३ हजार ७०६ बैल होते. अशा प्रकारे सन २००७ ते २०१२ दरम्यान ९ लाख ४९ हजार १५८ बैलांची घट झाली असून जवळपास १२ टक्के घट झाल्याची दिसून येत आहे. आता पुन्हा सन २०१८ मध्ये पशुगणना सुरू होणार असून जवळपास १२ ते १५ टक्के बैलांच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  यांत्रिकीकरणामुळेच बैलांची संख्या घटली

शेतीत वाढते यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे कमी वेळात होत आहेत. पेरणीपासून, डवरणी, निंदणी सारखे कामे होत असल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरला पसंती दिली आहे. त्यातच सालगड्यांची टंचाई, चारा टंचाई, बैलांच्या वाढत्या किंमती, एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्याने अल्पभुधारक बनलेल्या शेतकºयांना बैलजोडी ठेवण्यास परवडत नाही. त्यामुळे शेतीसाठी काही शेतकºयांनी मिनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. तर काही शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणुन कामे पूर्ण करत आहेत.

पोळ्याला कृत्रीम बैलांची पूजा

पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी बैलजोडी असायची. त्यामुळे बैलपोळ्याच्या दिवशी या बैलांची गावातून मिरवणूक काढल्यानंतर प्रत्येक घरी बैलाची पूजा केली जात होती. मात्र, आता शेतकºयांकडे बैलजोडीच राहिली नसल्याने बैलांच्या पोळा सणाला शेतकºयांना मातीच्या तथा कृत्रीम बैलांची पूजा करावी लागणार आहे. तर काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची प्रथा रूढ होत असून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरसह काही गावात ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात येत आहे.

Web Title: The mechanism reduced Bulls numbers by 12 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.