वैद्यकीय चमूने दिले मायलेकाला जीवदान!

By Admin | Published: January 14, 2017 12:35 AM2017-01-14T00:35:07+5:302017-01-14T00:35:07+5:30

शर्थीचे प्रयत्न; तिळ्यापैकी दोन बालकं दगावली!

Medical team gave birth to mylake! | वैद्यकीय चमूने दिले मायलेकाला जीवदान!

वैद्यकीय चमूने दिले मायलेकाला जीवदान!

googlenewsNext

मनोज पाटील
मलकापूर, दि. १३- वेळेच्या आधीच २८ वर्षीय गरोदर महिलेल प्रसुती कळा उठल्या त्यातच उदरात तीळे असल्याने प्रसुतीची गुंतागुंत वाढली असता वैद्यकीय चमूच्या प्रयत्नानंतर एका बाळासह मातेचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना मलकापूर तालुक्यातील मौजे वडोदा या गावात ११ जानेवारी रोजी घडली.
वडोदा येथील ग्रामस्थ रघुनाथ लोणकर यांच्या पत्नी रूखमा लोणकर या गरोदर महिलेला ३१ आठवड्यांच्या कालावधी पूर्ण झाला. रुखमा यांच्या उदरात तीन बाळ असल्याची बाब तपासणी दरम्यान आरोग्य उपकेंद्राच्या मदतनिस एन.एम. भंडारे यांच्या लक्षात येताच परिस्थिती प्रसुती होण्यासारखी असल्याने त्यांनी लगेच संदर्भ सेवेसाठी १0८ वर फोन लावला व त्यानंतर उमाळी आरोग्य केंद्राचे डॉ. खाडे यांना परिस्थितीबाबत अवगत केले.
या धडपडीतच सकाळी ६.२0 वाजता एका बाळाची प्रसुती करण्यात आली. दरम्यान रूग्णवाहीका व डॉ. खाडेसुध्दा हजर झाले. ७.३0 वा. मातेने दुसर्‍या बाळाला जन्म दिला. परंतु या बाळाने एकही श्‍वास घेतला नाही. अशावेळी वैद्यकीय चमुने बाळाला श्‍वास घेण्यास उत्तेजित केले. माऊथ टू माऊथ श्‍वास दिला ओटू ऑक्सीजन लावले. या धडपडीतच ७.४५ वा. तिसरे बाळ प्रसुत करण्यात आले. या तिनही बाळांना उब मिळावी म्हणून गरम कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले.
त्यानंतर मातेसह नवजात शिशूला ८.२0 वाजता मलकापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान बालरोग तज्ज्ञांनी माता व बाळांना तपासले असता दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाचे बाळाला मृत घोषित केले. तर क्रमांक एकच्या बाळाला संदर्भसेवेसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात रेफर करण्यात आले. आज रोजी त्या बाळाची व मातेची तब्येत व्यवस्थित ते सुखरूप आहे.

Web Title: Medical team gave birth to mylake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.