दिवठाणा सरपंचपदी मीनाक्षी मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:48+5:302021-03-20T04:33:48+5:30
चिखली : सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने, तालुक्यातील दिवठाणा व भोगावती येथील सरपंचपद रिक्त राहिले होते. दरम्यान, ...
चिखली : सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने, तालुक्यातील दिवठाणा व भोगावती येथील सरपंचपद रिक्त राहिले होते. दरम्यान, या गावासांठी नव्याने आरक्षण सोडत काढल्यानंतर, १९ मार्च रोजी पार पडलेल्या निवडणुकीत दिवठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राचार्या मीनाक्षी गजाननसिंह मोरे यांची अविरोध झाली आहे, तर भोगावती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनू दिलीप लोखंडे विजयी झाल्या आहेत.
तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीपश्चात गत फेब्रुवारीमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी टप्प्याटप्प्याने निवडणूक घेण्यात आली आहे. यामध्ये भोगावती व दिवठाणा येथील सरपंचपद आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने रिक्त राहिले होते. दरम्यान, नव्या आरक्षणानुसार, १९ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये दिवठाणा सरपंचपदी प्राचार्या मीनाक्षी गजाननसिंह मोरे यांची अविरोध निवड झाली आहे. प्राचार्या मीनाक्षी मोरे या स्व.शंकरबाबा मोरे यांच्या स्नुषा तर गावाचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजाननसिंह मोरे यांच्या पत्नी आहेत. प्राचार्या मीनाक्षी मोरे उच्च विद्याविभूषित असून, येत्या पाच वर्षांत दिवठाणा गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी निवडीपश्चात व्यक्त केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी किशोर पाटील यांनी काम पाहिले. निवडीपश्चात नवनिर्वाचित सरपंच मीनाक्षी मोरे, गजाननसिंह मोरे व ग्रामस्थांनी ग्रा.प.भवनासमोर जल्लोष साजरा केला.
दरम्यान, भोगावती ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सोनू दिलीप लोखंडे विजयी झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी वानखेडे आणि ग्रामसेविका सरकटे यांनी काम पाहिले. या निवडीपश्चात नवनिर्वाचित सरपंच सोनू लोखंडे यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी डॉ.म.इसरार, रवी लोखंडे, रामदास लोखंडे, साहेबराव पाटील, गजानन डुकरे पाटील, खलील नवरंगी, अशोक रामदास डुकरे, शेख अब्राहार, शिवाजी साखरे, रवींद्र लोखंडे, राजू सपकाळ, शेख आसिफ शेख आरिफ, गणेश सपकाळ, बंटी लोखंडे, शेख इकबाल, दीपक लोखंडे, बबलू चौधरी, नितीन लोखंडे, प्रीतम लोखंडे उपस्थित होते.