कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:18+5:302021-09-08T04:41:18+5:30

सन २०१७ पासून पूर्णवेळ पदोन्नती दिली नाही, ती सुरळीत करण्यात यावी, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना किमान वेतन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांची ...

Meet the demands of part-time employees of the Workers Welfare Board | कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

Next

सन २०१७ पासून पूर्णवेळ पदोन्नती दिली नाही, ती सुरळीत करण्यात यावी, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना किमान वेतन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांची विभागवार ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी व शैक्षणिक योग्यतेनुसार पूर्णवेळ कर्मचारी पदावर बढती देण्यात यावी, अर्धवेळ कर्मचारी म्हणून बजावलेल्या सेवेचा अर्धकालावधी या कर्मचाऱ्यांना बढती दिल्यानंतर सेवेत संलग्न करण्यात यावा, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना अनुकंपा योजना लागू करावी तसेच आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आहेत. यानुषंगाने मंडळाचे मुख्य कार्यालय असलेल्या मुंबई येथे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची अर्धवेळ कर्मचारी प्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी आयुक्त इळवे यांनी कर्मचाऱ्यांशी याबाबत चर्चा करून मागण्यांसंदर्भाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी संघटनेचे मानद सदस्य दिलीप जगताप, कर्मचारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष अनंत जगताप, सरचिटणीस सुधर्मा खोडे, गजेंद्र आहिर, सुनील चव्हाण, सायली नाईक, सचिन खरोडे, अर्धवेळ कर्मचारी प्रतिनिधी प्रल्हाद बांडे, गजानन आरू, विद्या शिंदे, भारत विभुते, सुजाता जाधव, श्वेताल सुतार, नवनीत राजूरकर, उर्मिला सातपुते, भारती बोबडे, रेखा कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Meet the demands of part-time employees of the Workers Welfare Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.