महात्मा फुले समता परिषदेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:57+5:302021-02-16T04:34:57+5:30
मेहकर : ओबीसी समाजाच्या उन्नती व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व ओबीसी समाजाने एकत्र येण्याची ...
मेहकर : ओबीसी समाजाच्या उन्नती व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व ओबीसी समाजाने एकत्र येण्याची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी केले. ते येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पवार फॅन क्लबचे अध्यक्ष सुनील झोरे, बुलडाणा जिल्हा संघटक एकनाथ सोनुने, माळी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अशोक इंगळे यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सरचिटणीसपदी, रफिक कुरेशी यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व गजानन पायघन यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य, तर मेहकर तालुका अध्यक्षपदी संदीप पांडव, कार्याध्यक्षपदी शिवा इंगळे, मेहकर शहराध्यक्षपदी प्रमोद सोभागे यांची अविरोध निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी एकनाथ सोनवणे, सुनील झोरे, अशोक इंगळे आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी अरुण पोपळघट, चिंगू पनाळ, पवन शिंदे, केतन अवचार, बंडू पांडव, श्याम इंगळे, जीवन पाडव, प्रकाश करमाळे, संतोष पांडव, विशाल पाडव, शिवाजी इंगळेसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.