जानेफळ येथे शांतता समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:40+5:302021-09-02T05:14:40+5:30

जानेफळ : आपण व आपले कुटुंब सुरक्षित असलो तर सण-उत्सव हे आपण दरवर्षीच साजरे करणार आहोत़ त्यामुळे आधी ...

Meeting of the Peace Committee at Janephal | जानेफळ येथे शांतता समितीची सभा

जानेफळ येथे शांतता समितीची सभा

Next

जानेफळ : आपण व आपले कुटुंब सुरक्षित असलो तर सण-उत्सव हे आपण दरवर्षीच साजरे करणार आहोत़ त्यामुळे आधी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यानंतर सण उत्सव साजरे करण्याचे नियोजन करायचे आहे़ कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ज्या साध्या पद्धतीने आपण हे सण उत्सव घरच्या घरीच साजरे करीत आहोत त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आपणास पोळा, गणपती व गौरी पूजन सारखे सण शॉर्टकट आणि साध्या पणाने साजरे करावे, असे आवाहन येथील ठाणेदार राहुल गोंधे यांनी केले़ ते शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बाेलत हाेते़

३० ऑगस्ट २०२१ रोजी येथील पोलीस स्टेशनमध्ये आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.यावेळी शांतता कमेटीचे सदस्य, गणपती मंडळाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीस उपस्थित नागरिकांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या दुचाक्या, तसेच चारचाकी वाहने, रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या दुकाने व त्यासमोर उभे राहणाऱ्या गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा हाेेत असल्याचा विषय मांडला तसेच यावर उपाययाेजना करण्याची मागणी केली़

याप्रसंगी सरपंच विश्वनाथ हिवराळे, ग्रा. पं. सदस्य सैय्यद महेबुब, संतोष तोंडे, बाळकीसन जाधव, बालू पाखरे, हिम्मतराव आवले, गजानन उंबरकर, दिलीप डोमळे,अमर राऊत, विशाल फितवे,गणेश सवडतकर, विजय केदारे, गजानन दुतोंडे,कृष्णा हावरे,गजानन वाडेकर, गोपाल लोखंडे,विजय नवले,सैय्यद जाबीर,आसिफ मिर्झा,अनिल मंजुळकर,डॉ.सुभाष गट्टाणी, जोहार्ले, शे.जमिल, अजिस सुर्या, ॲड.शाम काळे,संजय जोहार्ले, विलास जोहार्ले, निखिल जोहार्ले यांच्यासह गावातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवा

गणेश मंडळांनी एकत्रितरीत्या बसून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी़ ज्यामुळे गावात एकोपा निर्माण होईल आणि गावाची प्रगती होईल तसेच पोळा सण साजरा करताना कुठलाही वादविवाद होणार नाही यासाठी पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस विभागाला सहकार्य करावे. गणेश मंडळांनी गणेश उत्सव हा सार्वजनिकरित्या साजरा न करता घरच्या घरीच साजरा करावा, असे आवाहन यावेळी गाेंधे यांनी केले़

Web Title: Meeting of the Peace Committee at Janephal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.