महिला बचत गटांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:01 AM2021-03-13T05:01:59+5:302021-03-13T05:01:59+5:30
१९ महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेहकर या ठिकाणी महिला बचत ...
१९ महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेहकर या ठिकाणी महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शाखाधिकारी संदीप कारवरटर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून आपली आर्थिक प्रगती सुधारावी व बँकेच्या कर्जाची परतफेडसुद्धा वेळेवर करावी आदी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला पंचायत समितीचे धनंजय कायंदे, दीपाली मानवतकर आदींची उपस्थिती होती. दादुलगव्हाण येथील ११ महिला बचत गटांसह सांगावीवीर येथील सहा व सुभानपूर येथील एक अशा १९ महिला बचत गटांना कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. १२ महिला बचत गटांना महिला दिनाचे औचित्य साधून जवळपास १३ लाख १० हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी ज्योती वडतकर, तुषार गणवीर, बँक मित्र दीपक वाघ उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार गणवीर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल निमदेव, अविनाश मोरे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.