चिखलीच्या अनुराधा अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:43 PM2018-01-12T13:43:38+5:302018-01-12T14:03:18+5:30
चिखली : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘अनुबंध’सारखे उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असून माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या करिअरचा पाया उभा करण्यास विद्यार्थ्यांना मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ़ अरूण नन्हई यांनी केले.

स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘अनुबंध २०१८’ या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी डॉ.आर.पी.चोपडे, प्रा.आर.बी.मापारी, प्रा.व्ही.डी.गुरूदासाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास विविध शासकीय, निमशासकीय, तथा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत महाविद्यालयाचे सुमारे २०० माजी विद्यार्थी उपस्थिती होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी स्वप्नील निकम, महेश काकडे, अमोल काळबांडे, विक्रांत एकडे, प्रा.गौरव कुंडाळकर, सारंग पाटील, निलेश बोराडे, अमोल राजपुत, अशोक मोरे, अजय गुंजाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक संयोजिका प्रा.सरिता सावळे, तर संचालन प्रा.अभय दंडे यांनी केले.