मेहकर : २०० किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:14 PM2018-06-15T18:14:13+5:302018-06-15T18:14:13+5:30

मेहकर : खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे मेहकर मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार आहेत. 

Mehkar: 200 km long road standard | मेहकर : २०० किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती 

मेहकर : २०० किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती 

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता असल्याने  लवकर नुतनीकरण होत नव्हते. शासन दरबारी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची अनेक वेळा भेट घेऊन रस्ते हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.या रस्त्यांची दर्जोन्नती झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच हे रस्ते चकचकीत होणार आहेत.

मेहकर : खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे मेहकर मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार आहेत. 
    जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यातील आठ रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता असल्याने  लवकर नुतनीकरण होत नव्हते.  या परिसरातील नागरिक अनेक वेळा खा.प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत होते. ही समस्या ओळखून खा.प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे व मेहकरचे उपविभागीय अभियंता सुनील खडसे यांना रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगून तो मुख्य अभियंता अमरावती यांच्याकडे पाठविण्याबाबत सांगितले होते. तर जिल्हा परिषदेने सुद्धा या हस्तांतरणाबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला होता. शासन दरबारी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची अनेक वेळा भेट घेऊन रस्ते हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १३ जुन रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपत्रक काढून आठ रस्त्यांची दर्जोन्नती केली आहे. त्यामुळे आता हे रस्ते सार्वजनिक विभागाकडे येणार आहेत. यामध्ये गोमेधर, लोणी काळे, रत्नापूर, लावणा, मोळा पिंपरीमाळी, मेहकर रस्ता २१ किलोमीटर देऊळगाव कोळ, कोनाटी, पिंपरी खंदारे, ब्राह्मण चिकना, हिवराखंड, शिंदी, मातमळ सरस्वती, लोणार हा रस्ता १६ किलोमिटर मलकापूर पांग्रा, झोटिंगा, देऊळगाव कोळ,  खळेगाव, कारेगाव, कोयाळी, पिंपळखुटा  रस्ता २९ किलोमिटर मेहकर, अंत्री देशमुख, गुंधा रस्ता १४ किलोमिटर, गोरेगाव, पांग्री काटे, वडगाव माळी, चायगाव, मेहकर रस्ता १८ किलोमिटर द्रृर्गबोरी, भोसा, लोणी गवळी, उमरा देशमुख, शहापूर, जामगाव हा रस्ता २६ किलोमिटर@दहीगाव, मंगरुळ नवघरे, सावखेड, खुदनापूर, कळमेश्वर, सोनार गव्हाण, शेंदला, मोळा, आंध्रृड हा रस्ता ५४ किलोमिटर व शेंदुर्जन, सायाळा, कळपविहीर, बरटाळा २० किलोमिटर या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची दर्जोन्नती झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच हे रस्ते चकचकीत होणार आहेत, अशी माहिती स्वीय सहाय्यक रुपेश गणात्रा यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mehkar: 200 km long road standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.