मेहकर आगाराचा गलथान कारभार : लोणार येथून लांबपल्ल्याच्या बसफेर्या बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 21:12 IST2017-12-24T21:08:45+5:302017-12-24T21:12:00+5:30
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मेहकर आगाराचा गलथान कारभार : लोणार येथून लांबपल्ल्याच्या बसफेर्या बंद!
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफे-या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची गैरसोय होत आहे. लोणार-बीड ही फेरी सुद्धा मेहकर आगाराकडून बंद करण्यात आली असून या फेरीने प्रवास करणा-या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा करावा लागत आहे. तर मेहकर-लोणार-औरंगाबाद ही फेरी तळणी, गारटेली, चांगेफळ मार्गे सुरू होती. ही फेरीही मेहकर आगाराकडून बंद करण्यात आली आहे. लोणार येथून जाणा-या फे-या बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक बसफेर्यांचे सुद्धा नियोजन कोलमडले आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. लोणार येथून लांब पल्ल्याच्या बसफेर्या नियमित व वेळेवर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
महत्वाच्या बसफे-या सुरू करण्याबाबत वारंवार विभागीय कार्यालय बुलडाणा यांच्याकडे मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून केवळ आश्वासनेच मिळतात.
- भागवत प्रल्हाद खरात
सचिव, प्रवासी सेवा संघटना, लोणार.