मेहकर पालिकेच्या आठ कर्मचार्यांवर बिनपगारीची कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:12 AM2018-05-29T01:12:20+5:302018-05-29T01:12:20+5:30
मेहकर: शहरातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी नगरपालिकेत येतात; परंतु कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेला अचानक भेट दिली. यावेळी विविध विभागातील ८ कर्मचारी गैरहजर असल्याने त्याची बिनपगारी करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे ते ४0 दिवस नगरपालिकेत आले नव्हते; परंतु घरी असतानाही यांनी नगरपालिकेचे कोणतेही कामकाज थांबू दिले नाही. दरम्यान, २८ मे रोजी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी नगरपालिकेला अचानक भेट देऊन सर्व विभागाची झाडाझडती घेतली असता कर विभागातील अशोक सिरसाट, अशोक मानवतकर, प्रकाश गायकवाड, जावेद गवळी, पाणीपुरवठा विभागातील संतोष हिवाळे, बांधकाम विभागातील अजय हडोळे, प्रकल्प विभागातील रमेश उतपुरे यामधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर होते. तर काही कर्मचारी सुटीचा अर्ज देऊन सुटी मंजूर न होताही गैरहजर होते. त्यामुळे नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी नागरीकांच्या समस्या लक्षात घेऊन कर्मचार्यांची मनमानी वाढल्याने ८ कर्मचार्याची बिनपगारी व ५00 रुपये दंड अशी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या कारवाईमुळे पालिका परिसरात खळबळ उडाली आहे.
विकास कामांसाठी १३ कोटी रुपये मंजूर!
शहरातील विविध वार्डातील विविध विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिकेत असलेले जवळपास सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकास कामे करण्यात येतील. शहरातील विकास कामांसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी दिली.
यापुढे जर कोणी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत हजर राहत नसेल, तसेच केवळ सुटीचा अर्ज देऊन सुटी मंजूर न होता परस्पर गैरहजर राहत असेल तर अशा कर्मचार्यावर निलंबनाची कारवाईसुद्धा करण्यात येईल.
-हाजी कासम गवळी, नगराध्यक्ष, मेहकर.