मेहकर : तालुक्यातील चार गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:01 IST2018-01-10T00:01:18+5:302018-01-10T00:01:37+5:30

जानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्‍हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य  धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार  माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सोमवारला जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा  यांच्याकडे केली आहे. 

Mehkar: The people of four villages in the taluka are facing the risk of salinity water | मेहकर : तालुक्यातील चार गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा धोका

मेहकर : तालुक्यातील चार गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा धोका

ठळक मुद्देमाजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : क्षारयुक्त्त पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्या जात असल्याने मेहकर तालुक्या तील बार्‍हई, कल्याणा, लोणीगवळी व मेळजानोरी या चार गावातील जनतेचे आरोग्य  धोक्यात आले असून, त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार  माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी सोमवारला जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा  यांच्याकडे केली आहे. 
सुबोध सावजी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बार्‍हई ता. मेहकर या गावात  क्षारयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे मुतखडा, पोटाचे विकार व किडनीचे विकार होत आहेत.  गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, गावकर्‍यांनी तक्रारी करूनसुद्धा याकडे  कुणीच लक्ष दिलेले नाही. कल्याणा ता.मेहकर येथील पाणी पुरवठा नळयोजनेचे पाणी हे  पिण्यास अयोग्य आहे, असा शासकीय अहवाल आहे आणि या पाण्यामुळे पोटाचे  विकार, अंगाला खाज येणे तसेच इतरही रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. लोणी गवळी येथे  शासकीय नळयोजनेद्वारा येणारे पाणी पिण्यास अयोग्य आहेच; परंतु इतर वापरातील  पाणीसुद्धा अंगाला खरूज होणे, अंगाला खाज सुटणे आणि इतर आजारांना निमंत्रण  देणारे ठरत आहे. मेळजानोरी या गावातील जनतेस पिण्यासाठी व वापरासाठी केवळ हात पंपाचेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या हातपंपाच्या पाण्याच्या वापराने क्षारयुक्त  पाण्यामुळे शाळकरी मुलांपासून तर गावकर्‍यांचे सर्वांचे दात किडले आहेत, तसेच  सर्वांच्याच दातांवर काळे डाग पडत आहेत. येथील जनतेने दातांच्या आजारावर १0 ते  १५ हजार रुपये खचरुनसुद्धा दातांचा आजार ‘जैसे थे’ आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी  व मुतखड्याच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन आरोग्य  पथक पाठवून जनतेचे जीवन वाचवावे, अशीही मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी  यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे. 

Web Title: Mehkar: The people of four villages in the taluka are facing the risk of salinity water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.