मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:53 AM2018-02-19T01:53:05+5:302018-02-19T01:53:21+5:30

मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

Mehkar: Shivaji Maharaj's replica of the rangoli ranges from Ukali-Sukali! | मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती!

मेहकर : उकळी-सुकळी येथे रांगोळीतून साकारणार शिवाजी महाराजांची प्रतिकृती!

Next
ठळक मुद्दे२४00 चौरस फु टाची प्रतिकृती होणार तयार!

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : उकळी-सुकळी येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर रांगाळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची २४00 चौरस फु टांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
१९ फेबुवारी रोजी महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात वेगवेगळ्या रूपाने  साजरी केली जाते. याच शिवजयंतीचे निमित्त साधून उकळी सुकळी येथील ग्रामस्थांनी  स्थानिक रांगोळी कलाकार कृष्णा सासवडकर सोबत यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती ६0 बाय ४0 फूट अशी २४00 स्वे.फु.ची भव्य-दिव्य रांगोळी काढून साजरी करण्यात येणार आहे. उकळी सुकळी ग्रामस्थांच्या या उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहितीनुसार उकळी सुकळी येथील रांगोळी कलाकार कृष्णा सासवडकर यांनी आतापर्यंत खूप मोठमोठय़ा महापुरुषांच्या प्रतिमेच्या हुबेहूब दिसणार्‍या रांगोळ्या काढलेल्या आहेत; परंतु एवढय़ा  मोठय़ा आकाराची रांगोळी ते प्रथमच काढत आहेत. स्थानिक जगदंबा देवी मंदिर परिसरात येत्या १८ फे ब्रुवारी रोजी ही रांगोळी काढल्या जाणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी रांगोळी पाहण्यासाठी सर्वांना खुली असणार आहे, ही रांगोळी १९, २0, २१ फेबुवारीपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित हे रांगोळी प्रदर्शन पाहण्याकरिता जिल्ह्यातील सर्व छत्रपतीप्रेमींनी १९ फेबुवारी रोजी जगदंबा देवी संस्थान उकळी सुकळी घोरदडा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जगदंबा ग्रुप उकळी, कास्तकार ग्रुप सुकळी, शिवछत्र ग्रुप घोरदडा तसेच शिवजयंती सार्वजनिक उत्सव समिती उकळी सुकळी घोरदडा ग्रामस्थांनी केले आहे.
 

Web Title: Mehkar: Shivaji Maharaj's replica of the rangoli ranges from Ukali-Sukali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.