मेहकर उपजिल्हा रुग्णालयाची घोषणा
By admin | Published: May 11, 2017 07:04 AM2017-05-11T07:04:10+5:302017-05-11T07:04:10+5:30
आरोग्य विभागातील समस्या प्राधान्याने सोडवू - आरोग्य मंत्री
मेहकर : मेहकर येथून नागपूर-मुंबई हा महामार्ग गेलेला आहे. या रस्त्यावर सतत अपघाताच्या घटना घडत असतात. मेहकर परिसराचा वाढलेला व्याप, रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या तसेच मेहकर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, ही मागणी पाहता विशेष बाब म्हणून मेहकर येथे उपजिल्हा रुग्णालयाची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी करून आरोग्य विभागातील रिक्त जागा तसेच प्रत्येक ठिकाणच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडवू, असेही डॉ.दिपक सावंत यांनी सांगितले.डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा १० मे रोजी पार पडला. यावेळी डॉ.सावंत बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव हे होते. प्रमुख उपस्थितीत आ.संजय रायमुलकर, आ.शशिकांत खेडेकर, बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष उमा शिवचंद्र तायडे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, कृउबास सभापती माधवराव जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, जि.प.सदस्य आशिष रहाटे, राजेंद्र पळसकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, जितू सावजी, पं.स. सदस्य निंबाजी पांडव, दिलीप देशमुख, पं.स. सभापती जया खंडारे, उपसभापती राजू घनवट, प्रा. सचिन जाधव, अॉड. सुरेशराव वानखेडे आदी उपस्थित होते. आरोग्य केंद्रात तथा रुग्णालयात रिक्त जागांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत, तर कर्मचाऱ्यांवर कामाचा व्याप वाढत आहे. त्यामुळे रिक्त जागा तत्काळ भरण्यात येतील.
तसेच आशा वर्कर्सचे मानधन लवकरात लवकर वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू, तर बाळासाहेब ठाकरे आरोग्य विमा योजना लवकरच सुरू करण्यात येईल व या योजनांचा सर्व गोरगरिबांना लाभ देण्यात येईल. बी.ए.एम.एस. डॉक्टरांची स्थायी करण्याची मागणीसुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येईल. मेहकर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी खा.प्रतापराव जाधव, आ.संजय रायमुलकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. तर त्यावर दोन ते तीन बैठकासुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे या मागणीला विशेष बाब म्हणून मेहकर येथे उपजिल्हा रुग्णालयाची पुढील प्रक्रिया लवकरच सुरू करू, अशी घोषणाही यावेळी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जाहीर सभेत केली. खा.प्रतापराव जाधव यांनी सांगितले, की डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी ७० हजार लोक जोडलेले आहेत. तसेच मेहकर येथून जिल्हा रुग्णालय हे ८० ते ९० किलोमीटर अंतरावर आहे.
त्यामुळे रुग्णांना अनेकवेळा बाहेरगावी उपचारासाठी पाठवावे लागते. मेहकर येथून महामार्ग गेल्याने सतत अपघात होत असतात. त्यामुळे मेहकरला उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज असल्याने खा. जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी केले. या सर्व कार्यक्रमाला आर.के.बोरे, सुरेश काळे, संजय धांडे, प्रमोद काळे, संतोष चनखोरे, जयचंद बाठिया, रवी रहाटे, मनोज जाधव, पिंटू सुरजन, रामेश्वर भिसे, अक्काबाई गायकवाड, भारती चिंधाले, आनंद चिंधाले खामगाव, ओम सौभागे, संदीप तट्टे, सागर कडभणे, विलास आखाडे, गणेश लष्कर, तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अप्पार, गटविकास अधिकारी आर.पी. पवार, ए.एस. सानप, तहसीलदार संतोष काकडे, बालविकास अधिकारी डिगांबर खटावकर, आर.के. सपकाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सिद्धेश्वर पवार यांनी, तर आभार पऱ्हाड यांनी मानले.