स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मेहकर तालुक्याची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:54 PM2018-02-07T23:54:24+5:302018-02-07T23:56:37+5:30

मेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रुवारी  अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

Mehkar taluka will move towards erosion | स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मेहकर तालुक्याची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मेहकर तालुक्याची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल

Next
ठळक मुद्दे४२ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त ५६ ग्रामपंचायतींमधील कामेही अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत मेहकर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत हगणदरीमुक्त झाल्या आहेत, तर ५६ ग्रामपंचायतींचे शौचालय बांधकाम प्रगतिपथावर आहे. फेब्रुवारी  अखेरपर्यंत मेहकर तालुका हगणदरीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण मेहकर तालुका हगणदरीमुक्त झाला पाहिजे, यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.पी. पवार, सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप, सभापती जया खंडारे, उपसभापती राजू घनवट, गटसमन्वयक दत्तात्रय मगर, यांनी गेल्या अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये शौचालय बांधकाम व त्याचा वापर करणे, यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. कलापथक, गुडमॉर्निंग पथक, स्वच्छता रॅली, समाजप्रबोधन, ग्रामसभा, गृहभेटी, कॉर्नर बैठका या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधले पाहिजे, यासाठी सक्तीसुद्धा करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे शौचालय नसेल, अशा कुटुंबाला रेशनचे अन्नधान्य, निळे रॉकेल, कोणताही दाखला व शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, अशा सूचनासुद्धा सर्वांना देण्यात आल्या आहेत.  काही वेळेस  वरिष्ठ अधिकार्‍यांचे दौरेसुद्धा  आयोजित करण्यात आले होते. सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक शिक्षकवर्ग, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, यांनी गावा-गावांत जाऊन प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन शौचालय बांधकामासंदर्भात जनजागृती करावी, अशा सूचनासुद्धा पंचायत समिती स्तरावरून देण्यात आल्या होत्या. या सर्वांच्या परिश्रमाला यश येत असून, जवळपास ८२ टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, १८ टक्के बांधकाम बाकी आहे. २८  फेब्रुवारी रोजी मेहकर तालुका हगणदरीमुक्त झाला पाहिजे, यादृष्टीने मेहकर पंचायत समितीची  यशस्वी वाटचाल सुरू आहे.
-

Web Title: Mehkar taluka will move towards erosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.