मेहकर शहराच्या स्वच्छतेसाठी युवावर्ग सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:37 PM2018-06-13T15:37:38+5:302018-06-13T15:37:38+5:30
मेहकर : आपले शहर स्वच्छ रहावे,शहरात असलेल्या विविध महापुरूषांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ राहावा. शहरातील ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे यासाठी शहरातील काही युवक सरसावले असून मिशन मेहकर स्वच्छ अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविणे सूरू केले आहे.
मेहकर : आपले शहर स्वच्छ रहावे,शहरात असलेल्या विविध महापुरूषांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ राहावा. शहरातील ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे यासाठी शहरातील काही युवक सरसावले असून मिशन मेहकर स्वच्छ अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविणे सूरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांनी ९ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मधील सर्व स्वच्छता केली. शासनस्तरावरून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. आपले शहर स्वच्छ राहुन नागरीकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी शासनाकडून विविध सामाजीक उपक्र म राबविण्यात येत आहे. शासनाचा उद्देश चांगला असला तरीपण मेहकर तालुक्यात स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आता शासनावर अवलंबून न राहता आपले शहर आपणच स्वच्छ करून शहराचे नावलौकीक वाढविण्यासाठी शहरातील काही युवक सरसावले आहेत. मिशन मेहकर, स्वच्छ मेहकर असा संकल्प युवकांनी केला आहे. या संकल्पाच्या माध्यमातून शहरात असलेल्या विविध ऐतिहासिक वास्तुंची स्वच्छता विविध महापुरूषांच्या पुतळ्यांच्या आसपासचा परिसर स्वच्छ करणे. यासह शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचा उपक्रम मिशन मेहकर स्वच्छ मेहकर ग्रृपमधील डॉ. रविंद्र छबिले, प्रल्हाद भिसे, वैभव काळे, विजय वायाळ, प्रशांत राहटे, प्रशांत तिफणे, रोहन बोडखे, विनोद भिसे, जिवन जाधव, अजय धांडे, अमित ससाने या युवकांनी हाती घेतला आहे. स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ व्हावी. आपल शहर स्वच्छ सुंदर असले पाहिजे यासाठी शहरातील युवकांनी व नागरिकांनी श्रमदानातून हातभार लावावा, असे आवाहन मिशन मेहकर, स्वच्छ मेहकरचे अमित ससाने यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)