मेहकरातील कॉलेजची वेबसाईट हॅक; पाकिस्तान जिंदाबादचा संदेशासह झळकतोय पाकिस्तानी राष्ट्रध्वज

By निलेश जोशी | Published: June 16, 2023 05:39 PM2023-06-16T17:39:17+5:302023-06-16T17:39:48+5:30

सायबर पोलिसांनीच याची माहिती संबंधीत कॉलेज व्यवस्थापनास दिली.

Mehkara college website hacked, Pakistani national flag flashing on desktop with Pakistan Zindabad message | मेहकरातील कॉलेजची वेबसाईट हॅक; पाकिस्तान जिंदाबादचा संदेशासह झळकतोय पाकिस्तानी राष्ट्रध्वज

मेहकरातील कॉलेजची वेबसाईट हॅक; पाकिस्तान जिंदाबादचा संदेशासह झळकतोय पाकिस्तानी राष्ट्रध्वज

googlenewsNext

मेहकर - वेबसाईट हॅक करण्याचे लोण आता निमशहरी भागातही पोहोचले असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रसिद्ध अशा एमईएस कॉलेजची वेबसाईट हॅक झाल्याचे १६ जून राेजी सकाळी समोर आले. दरम्यान संगणकावर साईट अेापन करताच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे वाक्य आल्यानंतर पाकिस्तानी राष्ट्रध्वज डिस्प्ले होत असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.मुळातच फारसा वापर नसणारी ही वेबसाईट होती. या वेबसाईटमधील लुपहोल शोधन हॅर्क्सनी ही वेबसाईट हॅक केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान सायबर पोलिसांनीच याची माहिती संबंधीत कॉलेज व्यवस्थापनास दिली. त्यानंतर पहाणीमध्ये ही बाब समोर आली. अेाआरजी डॉमीन असलेली एमईएस कॉलेजची ही वेबसाईट होती. सुदैवाने वेबसाईटमधील सर्व डाटा सुरक्षीत असून ही वेबसाईट बनविणाऱ्या संगणक तज्ज्ञाने ती पूर्वत केली असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे. १६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एमईएस हायस्कूलची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मग वेगाने हालचाली करत ही वेबसाईट पुर्ववत करण्यात आली.

शिकाऊ हॅकर्सचा कारनामा

ही वेबसाईट हॅक करणारा हा शिकाऊ हॅकर्स असावा असा संशय सायबर पोलिसांना आहे. अेाआरजी डोमीन असलेल्या या वेबसाईटमधील लुपहोल शोधून हॅकरने त्याला जे साध्य करायचे होते ते साध्य केले. अशा पद्धतीने एखादी वेबसाईट हॅक करण्याची ही खूप जुनी पद्धत असून प्रारंभीक स्तरावर शिकाऊ असणाऱ्या हॅकरकडून वेगवेगळ्या वेबसाईटमधील कमकुवत बाबी शोधत त्याचा आधार घेत असे ‘स्कूल बाईज’ टाईप कारनामे केल्या जातात, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. या प्रकरणात प्रसंगी पाकिस्तानमधील आयपी ॲड्रेस निघू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरक्षा ऑडिट महत्त्वाचे

जिल्ह्यातील संस्थांनीही त्यांच्या असणाऱ्या वेबसाईटे सुरक्षा ऑडीट करून त्यांच्या वेबसाईटमधील लुप होल शोधून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. वास्तविक ही साधी, सोपी पद्धत आहे. परंतू त्यास खर्च जास्त येत असल्याने अनेक संस्था याकडे लक्ष देत नाही आणि त्यातून असे प्रकार घडतात. त्यामुळे सुरक्षा ऑडीटलाही संस्थांनी महत्त्व देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पोलिसात तक्रार देणार

प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार देत असल्याचे कॉलेजचे प्राचार्य गणेश परिहार यांनी सांगितले तर ठाणेदार निर्मला परदेशी यांनीही आम्ही तक्रार दाखल करून घेत असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Mehkara college website hacked, Pakistani national flag flashing on desktop with Pakistan Zindabad message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.