मेहकरची डाक सेवा ठरते ग्राहकांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:36+5:302021-03-19T04:33:36+5:30
येथील पोस्ट ऑफिसमध्ये शासनाने विविध योजनांसह पैसे काढणे, जमा करणे, आधारकार्ड दुरुस्ती आदी अनेक सुविधा या नागरिकांसाठी व ज्येष्ठ ...
येथील पोस्ट ऑफिसमध्ये शासनाने विविध योजनांसह पैसे काढणे, जमा करणे, आधारकार्ड दुरुस्ती आदी अनेक सुविधा या नागरिकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या ठिकाणी आलेल्या नागरिकांना या कार्यालयातून योग्य सुविधा पुरविण्यात येत नसून लिंक फेल असल्याचे कारण सांगून लोकांना मानसिक त्रास देण्याचे काम या कार्यालयात होत असल्याचे येथे ज्येष्ठ नागरिकांना सांगितले आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये शहरातील अनेक लोकांचे नवीन एटीएम कार्ड येत असून कोणतेही विचार न करता कार्य करत असलेले काही पोस्टमास्टर हे कोणतेही माणसाजवळ सोपवून देतात व काही नावांची विचारपूस न करता पत्ता बराेबर नसल्याने असे कारण देऊन एटीएम परत पाठवून देत असल्याचे अनेक उदाहरण समोर आलेले आहेत. या ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे एक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे कामचुकार व लिंक फेल झाल्याचे कारण सांगून नागरिकांना त्रास देणारे लोकांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे.