पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर ‘वर्गोन्नत’ उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:28+5:302021-05-06T04:36:28+5:30
प्रगतीपत्रकच बदलणार विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर साधारणत: १ मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक देण्यात येते. या प्रगतीपत्रकामध्ये यंदा बदल करण्यात ...
प्रगतीपत्रकच बदलणार
विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर साधारणत: १ मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक देण्यात येते. या प्रगतीपत्रकामध्ये यंदा बदल करण्यात येत आहे. प्रगतीपत्रावर उपस्थित दिवस, उंची, वजन, श्रेणी हा उल्लेख असणार नाही. प्रगतीपत्रकावर श्रेणी न टाकता ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख केला जाणार आहे.
मुले घरात कंटाळली...
मागच्या वर्षी शाळेत जात होतो. तेव्हा मजा येत होती; पण आता खूप दिवसांपासून मी घरातच आहे. घरी राहून खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतात, त्याचीच वाट पाहत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी शाळेत जाणार आहे.
उदय गुळवे, विद्यार्थी.
आमचे सर मोबाइलवर अभ्यासक्रम पाठवितात. तो आम्ही सोडवून घेतो. शाळेत शिकविल्याप्रमाणे मोबाइलवर पाठविलेले अभ्यास अवघड जातात. त्यामुळे शाळा सुरू व्हायला पाहिजे होत्या.
दीप देशमुख, विद्यार्थी.
मागे सर्वांच्याच शाळा सुरू झाल्या होत्या; परंतु आमचीच शाळा बंद होती. आता खूप दिवस झाले घरातच बसून राहावे लागत आहे. शाळा केव्हा सुरू होणार आणि आम्ही केव्हा आमच्या मित्र, मैत्रिणींना भेटू, याचीच प्रतीक्षा आहे.
तेजल गावंडे, विद्यार्थिनी.
पहिलीतील विद्यार्थी - ४२०११
दुसरीतील विद्यार्थी - ४५५७२
तिसरीतील विद्यार्थी - ४६३९३
चौथीतील विद्यार्थी - ४६९६१