बाप्पांना आज निरोप
By admin | Published: September 8, 2014 01:51 AM2014-09-08T01:51:58+5:302014-09-08T01:51:58+5:30
बुलडाणा शहरात आज गणेश विर्सजन; बुलडाणा शहरासह जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
बुलडाणा : संपूर्ण जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून भक्तांच्या सानिध्यात असलेल्या श्री गणेशाला आज भाविक-भक्त निरोप देणार आहेत. यासाठी विविध गणेश मंडळांच्या कार्यक र्त्यांसह प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण ८८१ गणेश मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. याशिवाय २९२ गावात ह्यएक गाव एक गणपतीह्णची स्थापना करण्यात आली. तर पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त ढोल-ताशांची जागा डीजेने घेतल्याचे दिसून येत होती. यावर्षीही अनेक गणेश भक्तांनी ङ्म्री गणेशाला निरोप देण्यासाठी डीजे बुक केले होते; मात्र पोलिसांनी डीजेला बंदी केली आहे.
बुलडाण्यात तगडा बंदोबस्त
बुलडाणा शहरात यावर्षी शिस्तबद्ध पद्धतीने गणेशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी गणेश मंडळाची बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात आला आहे. सदर मिरवणूक आपल्या परिसरातून संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, एसबीआय चौक मार्गे निघणार आहे. या मिरवणुकीत प्रथम मानाचा सुवर्ण गणेश मंडळाचा गणपती राहणार आहे. त्यानंतर मिरवणुकीत शहर परिसरात गणेश मंडळ शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत.
शांततेची परंपंरा कायम राखावी; पोलिसांचे आवाहन
खामगाव : खामगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी शहरात पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांच्यासह केंद्रीय व राज्य राखीव दलाचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता मानाच्या लाकडी गणपतीची मंदिरात आरती झाल्यानंतर या मिरवणुकीला फरशी येथून प्रारंभ होणार आहे. या वर्षीही गणेश विसर्जन ८ सप्टेंबर रोजी निर्मल टर्निंग ते राणा गेट व शिवाजी वेस ते बोरीपुरा या भागात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खामगाव शहर पोलिसांनी १५७ जणांना विविध कलमांनुसार नोटीस बजाविल्या आहे. तर गत काही वर्षांपासून शांततेत व उत्साहात होणारी गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षीही शांततेत व उत्साहात पार पाडावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी विसर्जन मार्गावर पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. तर बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर खामगावात तळ ठोकून असून, त्यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, शहर पो.स्टे.चे ठाणेदार दिलीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगाकाबू प थक तसेच शिवाजी नगर व शहर पो.स्टे.सह जिल्हय़ातील इतर पोलिस स्टेशनचे अधिकारी बंदोबस्त ठेवणार आहेत.