सायकल यात्रेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 05:40 PM2019-01-08T17:40:38+5:302019-01-08T17:41:07+5:30

खामगाव:  पर्यावरण रक्षणासोबतच व्यसनमुक्तीसाठी सातत्यपूर्ण झटणाऱ्या  नाशिक ते शेगाव सायकल यात्रेचे बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले आहे.

Message of environmental conservation through cycle yatra | सायकल यात्रेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सायकल यात्रेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:  पर्यावरण रक्षणासोबतच व्यसनमुक्तीसाठी सातत्यपूर्ण झटणाऱ्या  नाशिक ते शेगाव सायकल यात्रेचे बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले आहे. बुधवारी मलकापूर आणि खामगाव मार्गे ही पर्यावरण रक्षण यात्रा शेगावात पोहोचणार असून, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील ‘कावनई’च्या जलाने संत गजाननाला अभिषेक करण्यात येणार आहे.

नाशिक ते शेगाव सायकल यात्रेला २० वर्षांची सातत्यपूर्ण परंपरा असून, संत गजानन भक्त प्रल्हाद अण्णा भांड यांच्या नेतृत्वात यावर्षी ६ जानेवारी रोजी  सायकल यात्रेला नाशिक येथून सुरूवात झाली.  या सायकल यात्रेत १४ भाविकांचा समावेश असून,  पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, हरितक्रांतीचा संदेश दिल्या जात आहे. सोबतच स्वच्छ भारत अभियानाचाही जागर करण्यात येत आहे. संत गजानन महाराजांच्या ‘जीवभावे शिवसेवा’ आणि उष्ट्या अन्नांच्या संदेशासह सायकल चालविल्याने आरोग्य निरोगी राहते, असा जागर करण्यात येत आहे.  संत गजाननाच्या विश्वकल्याणाच्या संदेशासाठी काम करत असल्याचे प्रल्हाद अण्णा भांड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दररोज ११०किमी प्रमाणे ४५०किमी चे अंतर  कापत ९जानेवारी रोजी शेगावात पोहचणार आहे. नाशिक ,मालेगाव,मुक्ताई नगर (जळगाव)शेगाव असा प्रवास आहे. या सायकल वारीत सायकल यात्रेचे प्रवर्तक प्रल्हाद भांड यांच्यासह दिलीप देवांग,सीताराम भांड, दिलीप भांड, रामदास धामणे,राजेंद्र खानकरी,अनिल भवर संजय जाधव,शंकरराव बोराटे,सुनिल आरदळकर,अक्षय तगरे,शरद सरनाईक,दीपक भावसार, सुधाकर सोणवणे आदी सहभागी झाले आहेत.

सायकल चळवळीचा प्रचार-प्रसार!

प्रल्हाद भांड यांनी नाशिक जिल्हयासह महाराष्ट्रात सायकल चळवळ वाढविण्यात मोठे योगदान आहे. गेल्या  २० वर्षांत  सायकल यात्रेसह चार वेळा  पायी नर्मदा परिक्रमा त्यांनी केल्यात.  आतापर्यंत १८००० किमीचा प्रवास त्यांनी करीत, प्रबोधनाचा वारसा जोपासला आहे. बुधवारी सकाळी मलकापूर येथे संत गाडगेबाबा आपातकालीन पथकाच्यावतीने तर खामगाव येथे तरूणाई फांऊडेशनच्यावतीने या सायकल यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर ही यात्रा शेगावसाठी रवाना होईल.


 

Web Title: Message of environmental conservation through cycle yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.