गणेश उत्सवातून दिला पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:57+5:302021-09-21T04:37:57+5:30
शिक्षक नीलेश शिंदे व वर्षा नीलेश शिंदे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पा सजावटीतून विविध संदेश दिले. गणपतीसमोर प्लॅस्टिकमुक्त भारत ...
शिक्षक नीलेश शिंदे व वर्षा नीलेश शिंदे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पा सजावटीतून विविध संदेश दिले. गणपतीसमोर प्लॅस्टिकमुक्त भारत प्लॅस्टिकमुक्त अभियान, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी, अंगणी लावा एकच तुळस प्राणवायूचा होई कळस, वृक्ष आपल्याला काय देतात, सेव्ह द अर्थ, सेव्ह द वॉटर सेव्ह द गर्ल, प्लॅस्टिक कॅरीबॅगशी नाते तोडा, कापडी पिशव्यांशी नाते जोडा असे विविध पोस्टर लावण्यात आले होते. रोपवाटिकेतील लहान लहान वृक्ष घेऊन सजावट करण्यात आली होती. सोबतच सध्या देशावर कोरोनाचे संकट असून यापासून बचाव म्हणून काय काय करावे याचेदेखील देखाव्यात पोस्टर लावण्यात आले होते. नियमित हात धुणे, नियमित मास्क वापरणे, हात न मिळवणे, नियमित सॅनिटाझरचा वापर करणे, योग्य अंतर ठेवणे अशा विविध बाबींचा समावेश यावेळी करण्यात आला होता.
जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसाद
मेहकर : खंडाळा देवी येथील जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उद्धव फंगाळ, विजय वायाळ, प्रतीक मानघाले, संदीप ढोरे यांच्या हस्ते महाप्रसाद वितरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जय हनुमान गणेश मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी किशोर ढोरे, विष्णू वाशिमकर, योगेश जराड, योगेश वाशिमकर, गणेश दुधमोगरे, गणेश पोपळघट, नितीन सोनुने, रवी भोने, सचिन भोने, रमेश तांगडे, कैलास गायकवाड, रामेश्वर भोने, बळीराम पोपळघट, माधा ठाकरे, सागर पायघन आदी उपस्थित होते.