शेगावात म्हाडाच्या १८७ सदनिका तयार ; खळवाडीचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Published: January 13, 2017 08:00 PM2017-01-13T20:00:14+5:302017-01-13T20:00:14+5:30

शेगाव विकास आराखडा अंतर्गत श्री संत गजानन महाराज मंदिराला लागूनच असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीला आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत

MHADA prepares for 187 posts in Shiga Khalwadi question on the anagram | शेगावात म्हाडाच्या १८७ सदनिका तयार ; खळवाडीचा प्रश्न ऐरणीवर

शेगावात म्हाडाच्या १८७ सदनिका तयार ; खळवाडीचा प्रश्न ऐरणीवर

Next
>- फहीम देशमुख
 
शेगाव, (जि.बुलडाणा), दि. 13 - शेगाव विकास आराखडा अंतर्गत श्री संत गजानन महाराज मंदिराला लागूनच असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीला आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत तयार करण्यात आलेल्या विविध पध्दतीच्या सदनिकांचे लॉटरी पध्दतीच्या वितरण झालेले असून या सदनिका पूर्णपणे तयार आहे. लवकरच बाधीत नागरिकांना या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. दुसरीकडे सदर सदनिका ह्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असून स्थलांतरण मान्य नसल्याच्या हरकती अनेकांनी दाखल केल्या आहेत.
२0१0 साली शेगाव विकास आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर शहरातील श्री गजानन महाराज संस्थानला लागून असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीमधील कुटुंबीयांना आळसणा रोडवरील म्हाडाच्या जागेत तयार करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये स्थलांतरीत करण्याची योजना शासनाकडून आखण्यात आली होती. यामध्ये गजानन महाराज संस्थान समोरील मातंगपुरा वस्तीच्या पुनर्वसनासाठी म्हाडा अंतर्गत अण्णाभाऊ साठे नगर येथे १८७ सदनिका तयार करण्यात आल्या असून त्याचे लॉटरी पद्धतीने वितरणही झालेले आहे.  मात्र सदनिकांसह रोजगार ही उपलब्ध करून देण्यात यावे यासह इतर मागण्या मातंग समाज बांधवांच्या आहेत. आराखड्यातील विस्थापित झालेल्या मातंग बांधवांना या सदनिकांच्या माध्यमातून चांगले जीवन देण्याचा प्रयत्न असून विस्थापितांच्या रोजगाराचीही काळजी शासनाला आहे. विस्थापीतांना अल्प व्याजदरावर कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल. त्यामुळे विस्थापितांना रोजगाराचे साधन निर्माण करणे सहज शक्य होईल असे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले होते. मात्र त्यावर कुठलेच पाऊल सध्या तरी उचलले जात नसल्याचे दिसून येत आहे. मात्र मातंगपुरी हलविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
संतनगरी शेगांवच्या विकासासाठी शासनाने ४९६.४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यातील ६१.०३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून १२०.४३ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. मातंगपुरी हलविल्यानंतर आता खळवाडी परिसरातील रामदेव बाबा नगर, दौलतपुरा, कुरैशी मोहल्ला, मातंगपुरा, बालाजी फैल, सिंधी कॉलनी येथील वस्तींचेही पुनर्वसनाचा आराखड्यात समावेश आहे. सन २0१0 साली मंजूर या कामाला उशीर होत आहे म्हणून उच्च न्यायालयाने खळवाडीबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देशित केले होते. त्यानुसार खळवाडीतील एकूण १२ एकरातील रहिवाश्यांना अकोट रोडवरील गजानन महाराज संस्थानच्या ६ एकरातील शेतात हलविण्याबाबत कार्यवाहीला वेग आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ही प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान फक्त वाहन पार्कींगच्या नावाखाली आम्हाला गावाबाहेर हलवून चालणार नाही. आम्हाला पुनर्वसन नको, कुठल्याही परिस्थितीत जागा सोडणार नाही असा पवित्रा खळवाडी परिसरातील नागरिकांनी घेतला आहे.

Web Title: MHADA prepares for 187 posts in Shiga Khalwadi question on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.