भाजीपाला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:44+5:302021-08-21T04:39:44+5:30

व्यापारी हे बाजार समितीने ठरून दिलेल्या करापेक्षा १० ते १५ पटीने जास्त रक्कम भाजीपाल्यावर आकारण्यात येऊन एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक ...

Migrate Vegetable Market Agricultural Produce Market Committee | भाजीपाला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती स्थलांतरित करा

भाजीपाला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती स्थलांतरित करा

Next

व्यापारी हे बाजार समितीने ठरून दिलेल्या करापेक्षा १० ते १५ पटीने जास्त रक्कम भाजीपाल्यावर आकारण्यात येऊन एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. तर दुसरीकडे शासनाचा कर बुडवत आहेत. म्हणजे दोन्ही हातांनी लोणी खाण्याचे काम सदर हर्राशी करणारे लोक करीत आहेत. भाजीपाला हर्राशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणे आवश्यक असताना सदरहू हर्राशी करणारे व्यक्ती ही हर्राशी आठवडे बाजार परिसरात घेऊन बाजार समितीचे व शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजीपाला हर्राशी ही सकाळी अंधारात ३.३० ते ५ वाजेदरम्यान होते. शेतकऱ्यांना आपला माल येथे हर्राशीसाठी आणण्याकरिता थंडी पावसात रात्री ३ वाजता आपला जीव धोक्यात घालून यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य होईल अशा प्रकारे हर्राशीचे वेळापत्रक ठरवून देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. याकरिता निवेदन देण्यात आले. निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास आंधळे, मनसे तालुका अध्यक्ष राजू मांटे, यश कासारे ,आकाश जाधव उपस्थित होते.

Web Title: Migrate Vegetable Market Agricultural Produce Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.