बुलडाण्यात दूध आंदोलन पेटले, विकास, अमर दुधाच्या गाड्या फोडल्या, कार्यकर्ते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:47 AM2018-07-16T01:47:43+5:302018-07-16T01:47:45+5:30
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने 16 जुलै मध्यरात्रीपासून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे.
बुलडाणा : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने 16 जुलै मध्यरात्रीपासून राज्यभर आंदोलन सुरू झाले आहे. त्याचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यात सुध्दा उमटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात दोन ठिकाणी दुधाचे वाहनाची तोडफोड केली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने खासदार राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली राज्यभर दूध आंदोलन सुरू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. दूध आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आशा प्रकारच्या घोषणा देत बुलडाणा जिल्ह्यातील वाघजाळ फाट्यावर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले विकास दुधाचे वाहन फोडले तर मलकापूर येथे अमर दुधाच्या वाहनाची हवा सोडून देण्यात आली. दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलन छेडल्याचे रविकांत तुपकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज गनिमी काव्याने राज्यात कुठे ना कुठे आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.