लॉकडाऊन काळात दूध उत्पादक, डेअरीचालकांना मुभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:42+5:302021-02-23T04:52:42+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना घेऊन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली. ...

Milk producers, dairy operators allowed during lockdown! | लॉकडाऊन काळात दूध उत्पादक, डेअरीचालकांना मुभा !

लॉकडाऊन काळात दूध उत्पादक, डेअरीचालकांना मुभा !

Next

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना घेऊन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली. आयुक्त पीयूष सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. तुपकरांची मागणी लक्षात घेऊन आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूध उत्पादक व विक्रेत्यांना सूट देण्यासंदर्भात निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे आदेश पारित करताना त्यामध्ये दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रांना हवी असलेली सुधारित वेळ ठरवून दिली.

आता सकाळी ६ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दूध उपलब्ध राहणार आहे. म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंतचे ९ तास आणि सायंकाळचे अडीच तास त्यांना मिळणार आहेत. रविकांत तुपकर यांनी हा प्रश्न रेटून धरल्याने त्यावर प्रशासनाला तत्काळ निर्णय घेणे भाग पडले. यामुळे दूध उत्पादक, विक्रेते व संकलन केंद्र संचालकांना दिलासा मिळाला आहे. दुधावर अनेक शेतकऱ्यांचा चरितार्थ चालतो. सोबतच दूध विक्रेते व संकलनकर्त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. अमरावती विभागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता अंशत: लॉकडाऊन सुरू झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू करून सर्वांसाठी नियम घालून दिले आहेत. दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वेळ ठरवून देण्यात आली होती. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ही बाब स्वागतार्ह असली तरी दूध उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांचे यामुळे नुकसान होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची भेट घेतली.

शेतकऱ्यांची अडवणूक

ग्रामीण भागातून बुलडाण्याकडे दूध आणणाऱ्या शेतकऱ्यांना सकाळी पोलिसांनी अडविले. त्याचप्रमाणे दूध डेअरी व संकलन केंद्रवाल्यांचीही अडवणूक करण्यात आली. आधीच मागील लॉकडाऊनमध्ये कंबरडे मोडले, यावेळीही आर्थिकदृष्ट्या आपण खचून जाऊ म्हणून या सर्वांनी रविकांत तुपकरांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली. तुपकर यांनी प्रशासनाला दुधाचा प्रश्न मार्गी लावण्यास बाध्य केले.

Web Title: Milk producers, dairy operators allowed during lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.