लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:37 AM2017-09-07T00:37:50+5:302017-09-07T00:37:57+5:30

लांबलेला पावसाळा आणि हवामानातील  बदलामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील कपाशी  आणि सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.  क पाशीवर रसशोषक आणि गुलाबी बोंडअळीचे  आक्रमण असून, पाने खाणार्‍या अळींचा प्रादुर्भाव  झाला आहे. परिणामी, कपाशीच्या ४ लाख दोन हजार  ३४५ हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रावर तर सोयाबीनच्या १  लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार हे क्टरवरील पीक धोक्यात असल्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे.

Millions of hectares of crop risk! | लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात!

लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात!

googlenewsNext
ठळक मुद्देगुलाबी बोंड अळीच्या संक्रमणाचाही धोका!शेतकरी संकटात

अनिल गवई । 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  लांबलेला पावसाळा आणि हवामानातील  बदलामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील कपाशी  आणि सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.  क पाशीवर रसशोषक आणि गुलाबी बोंडअळीचे  आक्रमण असून, पाने खाणार्‍या अळींचा प्रादुर्भाव  झाला आहे. परिणामी, कपाशीच्या ४ लाख दोन हजार  ३४५ हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रावर तर सोयाबीनच्या १  लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हजार हे क्टरवरील पीक धोक्यात असल्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्याचे कापसाचे एकू ण सरासरी क्षेत्र  २  लाख ४४  हजार ४३0 हेक्टरचे आहे. यापैकी  जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ५ हेक्टरवर प्रत्यक्षात का पसाचा पेरा झाला आहे. तथापि, सुरुवातीला पावसात  पडलेला खंड आणि त्यानंतर वातावरणातील  बदलामुळे  वाढलेल्या तापमानामुळे  कपाशी पिकावर  रस शोषक कीड, तुडतुडे,  फुलकिडे, पांढरी माशी  आणि लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. 
घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर  शेगाव सोबतच घाटावरील लक्षावधी हेक्टरला  फटका बसला आहे. रसशोषक किडीने कपाशीच्या  पानातील अन्नद्रव्ये शोषण केल्याने पाने कोकडल्या  गेली आहेत. परिणामी, उत्पादनात मोठय़ा प्रमाणात  फटका बसणार असल्याची शक्यताही कृषि क्षेत्रातील  तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

शेतकरी संकटात
-जिल्ह्यातील काही भागात बी.टी. नैसर्गिकरीत्या  येणारी बोंडअळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात  दिसून आल्यामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. वेळे पूर्वीच दिसून आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीचे  नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- कपाशीच्या बोंडात येणारी गुलाबी बोंडअळी  लवकर लक्षात येत नसल्याने शेतकर्‍यांनी नियमित  िपकातील हिरवी बोंडे फोडून आतमध्ये पाहणे  आवश्यक आहे.
- या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा  वापर करावा, सर्वेक्षणासाठी एकरी दोन कामगंध सा पळे आणि पतंग पकडण्यासाठी ८ ते १0 सापळे  करावेत. 
- प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून  नष्ट कराव्यात. कामगंध सापळ्यात ८-१0 पतंग  सलग तीन रात्री किंवा ५-१0 प्रादुर्भावग्रस्त बोंडे  असल्यास रासायनिक औषधाचा वापर करावा. काही  ठिकाणी पांढरी माशी आणि किडीचाही प्रादुर्भाव  होण्याची शक्यता आहे.

परिसरात वातावरणातील बदल व तापमानामुळे क पाशी आणि सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत  आहे. या गोष्टीला न घाबरता शेतकर्‍यांनी कपाशी व  सोयाबीन पिकाची नियमित पाहणी करावी व वेळीच  प्रादुर्भावग्रस्त किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक  कीड नियंत्रणाचा मार्ग अवलंबावा. काही अडचण  आल्यास कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांशी संपर्क  साधावा.
- एन.के. राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी,  खामगाव.

Web Title: Millions of hectares of crop risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.