जलसाठय़ात अत्यल्प वाढ!

By admin | Published: September 13, 2016 02:49 AM2016-09-13T02:49:13+5:302016-09-13T02:49:13+5:30

खामगाव तालुकातील धरणांची स्थिती महिनाभरापासून पावसाची दडी; तोरणा प्रकल्पात घट.

Mineral growth in the reservoir! | जलसाठय़ात अत्यल्प वाढ!

जलसाठय़ात अत्यल्प वाढ!

Next

खामगाव (जि. बुलडाणा), दि. १२ : यावर्षी सुरुवातीला दमदार सुरुवात झालेल्या पावसाने ऑगस्टपासून दडी मारली. त्यामुळे तालुक्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पात जलसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. गत महिन्यातील अन् आजचा प्रकल्पातील जलसाठा यामध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. दमदार पावसाअभावी जलसाठय़ातील अपेक्षित वाढ थांबली आहे.
खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा, मस व ढोरपगाव हे मध्यम प्रकल्प तर बोरजवळा, गारडगाव, टाकळी, पिंप्री गवळी व लांजुड लघू प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षात पावसाची सरासरी कमी झाल्याने धरणातील जलसाठा अपेक्षित वाढलाच नाही. खरिपाच्या पिकांना अत्यल्प पावसाचा फटका तर रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी नाही, अशा विदारक परिस्थितीत शेतकरी अडकला. यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी सुरुवातीपासून पावसाळा समाधानकारक राहिला. पेरणी करून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी चांगले उत्पन्न निघण्याची आशा होती; मात्र ऐन पिके बहरण्याच्या वेळेस पावसाने दडी मारली. या दडीचा परिणाम शेतीबरोबर धरणातील जलसाठय़ाला बसला आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने जलसाठय़ात वाढ दिसून आली. १३ ऑगस्ट रोजी मन प्रकल्पात ६३.६२ टक्के (२३.४३ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये महिन्यानंतर सद्यस्थितीत केवळ ३ टक्के जलसाठा वाढला आहे. सध्याचा जलसाठा ६६.९८ टक्के (२४.६६ दलघमी) आहे. तोरणा प्रकल्पाने तर ५0 टक्केही पाणी पातळी ओलांडली नाही. सद्यस्थितीत तोरणामध्ये ३७.९१ टक्के (२.९९ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी हा जलसाठा ३८.४३ टक्के (३.0३ दलघमी) होता. ढोरपगाव प्रकल्पात ८३.५२ टक्के (४.९४ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये सध्या ८६.९९ टक्के (५.0८ दलघमी) जलसाठा आहे. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्प परिसरात यावर्षी सर्वाधिक कमी पावसाची नोंद आहे. ज्ञानगंगा परिसरात आतापर्यंत २५0 मि.मी. पावसाची नोंद असून, धरणात ४३.८६ टक्के (१४.८८ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी ही नोंद ४१.८२ टक्के (१४.१९ दलघमी) एवढी होती. तालुक्यातील मस हा प्रकल्प १00 टक्के भरलेला आहे. ओव्हरफ्लो झालेल्या या प्रकल्पातून १३ ऑगस्ट रोजी ५ सेंमी पाण्याचा विसर्ग सुरू होता. यातील जलसाठा १00 टक्के कायम आहे. लघू प्रकल्प बोरजवळामध्ये ५६.१0 टक्के जलसाठा आहे, तर गारडगाव ८९.७६ टक्के, टाकळी ८७.८६ टक्के, लांजुड ७४.२२ टक्के तर पिंप्री गवळीमध्ये १00 टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील वाढ न होता थांबलेला जलसाठा चिंतेचा विषय बनला आहे. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होऊन धरणाच्या पाणीपातळीत १00 टक्के वाढ होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

Web Title: Mineral growth in the reservoir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.