अल्पवयीन चुलत साळीचा जावयाने केला विनयभंग
By योगेश देऊळकार | Updated: October 29, 2023 17:17 IST2023-10-29T17:17:18+5:302023-10-29T17:17:29+5:30
जावयाने अल्पवयीन चुलत साळीच्या पाठीवर हात फिरवित तिचा विनयभंग केला.

अल्पवयीन चुलत साळीचा जावयाने केला विनयभंग
खामगाव : जावयाने अल्पवयीन चुलत साळीच्या पाठीवर हात फिरवित तिचा विनयभंग केला. तसेच तिची आईला धमकी देत वडिलांना मारहाण करून तो पसार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी गेरू माटरगाव शिवारात घडली. याप्रकरणी हिवरखेड ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी जावयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत कारमध्ये बसून जात होती. त्यावेळी माटरगाव शिवारात जावयाने त्यांच्या कारला हात दाखवून थांबविले. त्यावेळी मुलीचे वडील गाडीतून खाली उतरून दुसरीकडे गेले. तर आई व ती गाडी खाली उतरल्यानंतर आरोपीने त्या अल्पवयीन मुलीच्या पाठीवर हात फिरविला. हा प्रकार त्या अल्पवयीन मुलीला वाईट वाटल्याने तिने हात काढा, असे म्हटले. त्यावरून आरोपीने त्या दोघींना धमकी दिली. मुलीचे वडील आले असता त्यांनाही त्याने मारहाण केली. त्यानंतर मुलीची बदनामी करेल, अशी धमकी देत तो पळून गेला. याप्रकरणी त्यांनी हिवरखेड पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.