अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Published: December 31, 2014 12:27 AM2014-12-31T00:27:36+5:302014-12-31T00:27:36+5:30
दोन आरोपींना अटक ; एक फरार.
सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील वर्दडी येथील तीन जणांनी अंजनी बु. येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध किनगावराजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, १ जण फरार आहे. अंजनी बु. येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला दीड महिन्यापूर्वी वर्दडी येथील राजूल शर्बत पवार, पराग कटिंग भोसले आणि अशोक श्रीराम चव्हाण या तिघांनी मोटारसायकलवर वर्दडी बु. येथे पळवून आणले आणि तिच्यावर राजूल पवार याने बलात्कार केला. सदर घटनेची तक्रार पीडित मुलीची आई- वडील देण्यासाठी जात असताना तिघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी राजूल पवार, पराग भोसले, अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध कलम ३७६ (१), ३४१, १0९, ५0६, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य आरोपी राजूल पवार आणि पराग भोसले यांना अटक केली आहे.