मुलीचा विनयभंग करणार्या मुख्याध्यापकास चोपले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:00 AM2017-10-12T01:00:30+5:302017-10-12T01:01:19+5:30
नांदुरा : मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपल्या लहान भावास आणावयास गेलेल्या मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी वडगाव डिघी येथील जिल्हा परिषद शाळेत साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर बुधवारी दुपारी मुलीच्या संतप्त नातेवाइकांसह गावकर्यांनी संबंधित मुख्याध्यापकाला चांगलाच चोप दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपल्या लहान भावास आणावयास गेलेल्या मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी वडगाव डिघी येथील जिल्हा परिषद शाळेत साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर बुधवारी दुपारी मुलीच्या संतप्त नातेवाइकांसह गावकर्यांनी संबंधित मुख्याध्यापकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
राजेश नामदेव ढोले रा. दाताळा, ह.मु. मलकापूर हा शिक्षक जुलै २00९ रिसोड जि.वाशिम येथून जिल्हा बदलीवर बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पंचायत समितीमध्ये रूजू झाला. तेव्हापासून तो वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असून, त्याच्याकडे मुख्याध्यापकाचाही प्रभार आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पीडितेचा लहान भाऊ हा सदर शाळेत तिसर्या वर्गात शिकत असून, त्याचा हात फॅ्र क्चर आहे. आपल्या भावाच्या हाताचे प्लॅस्टर ओले होऊ नये म्हणून १४ वर्षीय त्याची बहीण छत्री घेऊन संध्याकाळी शाळा सुटण्याचे वेळी भावाला घेण्यासाठी गेली. सदर मुलीच्या भावाला फळ्यावर लिहिलेले सदर शिक्षकाने वाचण्यास सांगितले व त्याच्या पाठीमागे सदर मुलीचा विनयभंग केला. घडलेली हकीकत मुलीने घरी जाताच घरातील मंडळींना सांगितली. दरम्यान, शाळा सुटल्याने शिक्षक निघून गेला. दुसर्या दिवशी सकाळी ११ वा. शाळेत सदर शिक्षक येताच मुलीच्या नातेवाईक व गावकर्यांनी शिक्षकास जाब विचारला असता, असे काही केलेच नसल्याचे तो सांगु लागला; परंतु गावकर्यांनी धुलाई कर ताच त्याने गैरकृत्य केल्याचे उघड झाले. दरम्यान, सदर प्रकार काही गावकर्यांनी पोलिसांना कळवला असता, पोलिसांनी जिल्हा परिषद शाळा गाठून सदर राजेश ढोले या शिक्षकास ताब्यात घेतले व मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चौकशीकरिता नेले. सदर पीडित मुलीने त्या शिक्षकाविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षक राजेश ढोले याच्याविरुद्ध कलम ३५४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घुगे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सदर आरोपीची चौकशी केली असून, पोलीस निरीक्षक साळुंके यांचे मार्गदर्शनात पीएसआय सोनवणे करीत आहेत.