विवाहिता दाेन महिन्यांच्या मुलासह बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:24 AM2021-07-15T04:24:05+5:302021-07-15T04:24:05+5:30
महिलेस मारहाण, गुन्हा दाखल माेताळा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे येथील एका महिलेस मारहाण केल्याची घटना १२ ...
महिलेस मारहाण, गुन्हा दाखल
माेताळा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे येथील एका महिलेस मारहाण केल्याची घटना १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोंसिंग येथे घडली. या प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रभाकर लक्ष्मण सावंत असे आराेपीचे नाव आहे़
काेराेनामुक्त गावात शाळा सुरू करा
चिखली : शाळा व महाविद्यालय सुरू नसल्यामुळे विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहेत. मुख्यत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतिशय नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावे व शहरात शाळा व महाविद्यालये सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे़
शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्यास यश
अंढेरा : शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वार आहे, पण त्यासाठी परिश्रम नक्कीच करावे लागतात. जोपर्यंत तुमचे शिक्षण घेण्याचे वय आहे, तोपर्यंत तुम्ही शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षणावर लक्ष केंद्रित केले तर यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप सानप यांनी केले.
मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आंदाेलन
बुलडाणा : अनुसूचित जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील सरकारी व निमसरकारी सार्वजनिक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्यात येऊ नये. सार्वजनिक उपक्रमातील आस्थापनांमध्ये नियमबाह्य भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये आदींसह इतर मागण्यांसाठी १२ जुलै रोजी मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आंदाेलन करण्यात आले़
शिक्षकांनी समाजाला दिशा द्यावी
बुलडाणा : शिक्षकांनी आपल्या अध्यापनातून सामाजिकतेची जाणीव ठेवून समाजाला दिशा द्यावी, असे मत प्रा. संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले.
येथील विदर्भ युवक विकास संस्थेच्या महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयात आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.