पैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बेपत्ता
By admin | Published: October 2, 2016 02:45 AM2016-10-02T02:45:18+5:302016-10-02T02:45:18+5:30
दोन्ही युवक बुलडाणा येथील रहिवासी.
बुलडाणा, दि. 0१- तालुक्यातील पळसखेड नागो शिवारात असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक पाण्याच्या जोरदार प्रवाहात बेपत्ता झाले. ही घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजेदरम्यान घडली. बेपत्ता युवकांचा शोध सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलडाणा शहरातील हमालीचे काम करणारे जमील खान दुलेखान (३८), ताज खान (३0) तसेच सुर्या खरे (३५) हे तिघे आज सकाळी ऑटोद्वारे बुलडाणा-अजिंठा मार्गावरील पळसखेड नागो शिवारातील वाहणार्या पैनगंगा नदीवर पोहचले. याठिकाणी नदीत बांधलेल्या बंधार्यावर पोहण्यासाठी प्रथम सुर्या खरे यांनी उडी मारली. मात्र रात्री झालेल्या ा दमदार पावसामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहात सुर्या खरे वाहू लागला. त्याला वाचविण्यासाठी जमील खान याने नदीत उडी मारली. मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहामुळे वाहू लागले. या घटनेची माहिती त्यांचा मित्र ताज खान यांनी बुलडाण्यातील नातेवाईकांना दिली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठय़ा संख्येने देऊळघाट, दत्तपूर येथील युवक त्यांना शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र ते दोघेही मिळून आले नाही.