मिशन जी-पॅट २०२२उपक्रमास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 AM2021-06-01T04:25:45+5:302021-06-01T04:25:45+5:30
संस्थेचे सचिव माजी आमदार राहुल बोंद्रे कल्पकतेतून महाविद्यालयाने हाती घेतलेल्या या उपक्रमाअंतर्गत जी-पॅट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे ...
संस्थेचे सचिव माजी आमदार राहुल बोंद्रे कल्पकतेतून महाविद्यालयाने हाती घेतलेल्या या उपक्रमाअंतर्गत जी-पॅट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथील प्रसिद्ध प्रोफेसर डॉ.राजेंद्र पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यानुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. बियाणी यांच्या मार्गदशनाखाली विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने वेबिनार सिरीज घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी प्राचार्य डॉ. बियाणी, डॉ. राजेंद्र पाटील आदींनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रा. पवन फोलाने यांनी मानले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. एच. काळे, प्राचार्य डॉ. आर. आर. पागोरे, प्रा. यु. एम. जोशी, प्रा. एस. एस. कुळकर्णी, डॉ. ए. ए. गवई, डॉ. एजाज शेख, डॉ. सचिन काळे, डॉ. दुधे, डॉ. गोपाल बिहानी, डॉ. मोहनकुमार उप्पला आदींसह सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.