विकासासाठी आ.महालेंचे नेतृत्व सक्षम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:24+5:302021-01-25T04:35:24+5:30

चिखली नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदासाठीच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पक्षाचा आदेश झुगारून काँग्रेस नगरसेवकांच्या सहकार्याने सभापतीपद पदरात पाडून घेतले. ...

MLA's leadership capable for development! | विकासासाठी आ.महालेंचे नेतृत्व सक्षम !

विकासासाठी आ.महालेंचे नेतृत्व सक्षम !

Next

चिखली नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदासाठीच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक पक्षाचा आदेश झुगारून काँग्रेस नगरसेवकांच्या सहकार्याने सभापतीपद पदरात पाडून घेतले. यामुळे भारतीय जनता पक्षाने हे प्रकरण गंभीर घेतले आहे. याप्रकरणी भाजपच्या कोअर कमिटीसह न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस यांनी देखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आमदार श्वेता महाने यांनी गत नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवक आणि अध्यक्ष निवडून येण्यासाठी रक्ताचे पाणी केले. आमदार होण्याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखली शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. सुरू असलेली कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी सातत्याने त्या पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळेच शहरात सुरू असलेली कामे चांगली होत आहेत. शहरात सुरू असलेल्या कामात कुठेही भ्रष्टाचार झाला, कामे नित्कृष्ट झाली किंवा होईल त्याची मात्र चौकशी होणार यात काही चुकीचे काहीच नाही. भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आ.महाले प्रशासनाला धारेवर धरतात. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही अशा सूचना देतात. त्यामुळे वैयक्तिक लाभासाठी सभापतीपद मिळविणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकाने चुकीचे आरोप करू नये, आ.श्वेता महाले यांनी कधीच कोणत्याही कामात अडथळा निर्माण केला नाही, उलटपक्षी त्यांच्या नेतृत्वामुळेच शहरात विकासकामे होत आहेत, असे वजीराबी शे.अनिस यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

Web Title: MLA's leadership capable for development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.