खामगाव येथील प्रशासकीय इमारतीची ‘मनसे’ सफाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 03:49 PM2018-11-05T15:49:28+5:302018-11-05T15:49:51+5:30
खामगाव : येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी करण्यात आली. या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासकीय स्थरावरून वारंवार दुर्लक्ष केल्या जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील प्रशासकीय इमारतीची स्वच्छता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी करण्यात आली. या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासकीय स्थरावरून वारंवार दुर्लक्ष केल्या जात होते. ‘लोकमत’नेही या इमारतीतील अस्वच्छतेबाबत २ आॅक्टोबर रोजी सचित्र वृत्त प्रकाशित केले होते.
खामगाव येथील प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतेबाबत प्रशासकीय स्तरावरून कमालिची अनास्था दिसून येते. स्वच्छताही सेवा अभियानातही या इमारतीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणली. शहरातील सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्यावतीनेही या इमारतीच्या अस्वच्छतेबाबत आवाज उठविला. मात्र, प्रशासकीय स्तरावरून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दीपावलीच्या मुहूर्तावर प्रशासकीय इमारतीची ‘मनसे’ सफाई करण्यात आली. यावेळी इमारतीच्या आवारातील घाण मनसैनिकांनी पाण्याच्या टँकरने धुऊन काढली. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा काळे, माजी शहर अध्यक्ष नंदू भट्टड, आनंद गायगोळ, आकाश पाटील, योगेश पालिकमकर, यशवंत गव्हादे, शे. सलमान यांच्यासह मनसेच्या पदाधिकाºयांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
चोख पोलिस बंदोबस्त!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वच्छता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारतीबाहेर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मनसेच्या स्वच्छता अभियानानंतर पोलिस बंदोबस्त काढण्यात आला.